आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story About How Womens Live In Brothel Of Nevada Life Moments Clicked By Photographer

शरीरसुखासाठी जेथे जातात लोक, तेथे \'सेक्स अन् सौंदर्या\'च्या मधोमध अशी आहे Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवाडा येथे जाण्यापूर्वी फोटोग्राफर मार्क मॅकअँड्र्यूज हे कधीही स्ट्रीप क्लब किंवा वेश्यालयात गेले नव्हते. पण आता याठिकाणी असलेल्या प्रत्येक वेश्यालयात ते राहून आले आहेत. याठिकाणचे वातावरण आणि तेथे काम करणाऱ्या स्त्रिया यांचे जीवन कसे असते ते कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मार्क यांनी तसा निर्णय घेतला.

सुमारे पाच वर्ष मार्क यांनी याठिकाणी असलेल्या विविध वेश्यालयांत आणि स्ट्रीप क्लबमध्ये जाऊन फोटो काढले. आठवठाभर ते महिना महिना मार्क या स्त्रियांसोबत राहिले. त्यांच्या सोबत त्यांच्याच घरात राहून पहाटे उठल्यापासून ते संपूर्ण दिवसातील त्यांच्या दैनंदीन कामांचे निरीक्षण मार्क करायचे. त्यानंतर त्यांना हवे तसे फोटो मार्क यांनी टिपले. या अनुभवातून त्यांना एक असे जग पाहायला मिळाले जे आजवर कोणीही पाहिलेले नसेल.
याबाबत बोलताना मार्क म्हणतात, तुम्ही सकाळी उठले आणि तुमच्या फोटोच्या सब्जेक्टला तुम्ही दूध, चहा किंवा कॉफी देता हा अगदी वेगळा अनुभव होता. यामुळे तुमचे आपसांतील नाते पूर्णपणे बदलून जाते. अशा प्रकारे मैत्री वाढवल्यान हे लोक तुम्हाला त्यांच्या जगात अधिकाधिक प्रवेश करण्याची संधी देत असतात. या फोटो प्रोजेक्टमधील काही मोजके फोटो मार्क यांना नेवाडा रोज नावाच्या पुस्तकामध्ये प्रकाशित केले आहेत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, वेश्यालयातील रेट कार्डवर कसे असतात दर... पाहा मार्कने काढलेले फोटो...

बातम्या आणखी आहेत...