आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सुंदर महिलांपैकी एक होत्या गायत्रीदेवी, शेवटच्या काळात पडल्या होत्या एकाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक अशी ख्याती मिळवलेल्या दिवंगत महाराणी गायत्री देवी यांचा आज वाढदिवस आहे. गायत्री देवी या जयपूरचे महाराज मानसिंह यांच्या महाराणी होत्या. त्यांच्या सौंदर्याची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चा होती. गायत्रीदेवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही गायत्री देवीच्या आयुष्याबद्दल काही खास माहिती आपल्याला देणार आहोत.


लंडन येथून पूर्ण केले शिक्षण 
राजमाता गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 रोजी झाला होता. राजकुमारी गायत्री देवी यांचे वडील जितेंद्र नारायण यांचे कुच बिहार येथील राजघराण्याशी संबंध होते. गायत्री देवी यांनी लंडन, शांतिनिकेतन आणि स्विटजरलैंड येथून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लग्न जयपूरचे महाराजा सवाई मान सिंह (द्वितीय) यांच्यासोबत 9 मे 1940 रोजी झाला होता.


उत्तम घोडेस्वारही होत्या महाराणी गायत्रीदेवी..
गायत्री देवी केवळ महाराणी नव्हे तर त्या उत्तम घोडेस्वार आणि पोलो प्लेअर होत्या. गायत्री देवी यांना शिकारीचाही शौक होता. त्यांना मोठ्या गाड्याही आवडत असत. त्यांच्या दिमतीला त्यावेळी मर्सडीज बेंज, रॉल्स रॉयज आणि एक एयरक्राफ्ट होते.


 

बातम्या आणखी आहेत...