आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

208 किलोच्या वजनासह लढायचे महाराणा प्रताप, मृत्यूनंतर अकबरलाही आले होते रडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर- 19 जानेवारी 1597 रोजी महावीर महाराणा प्रताप यांना वीरमरण आले होते. आजच्या दिवशी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. राजस्थानची भूमी कायम वीरांची आणि महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली गेली आहे. त्याच वीरांपैकी एक म्हणजे महाराणा प्रताप. या महान योद्ध्याबाबत, त्यांच्या वीरतेबाबत आणि त्यागाबाबत divyamarathi.com ची ही विशेष माहिती... 

 

1576 मध्ये हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये असे युद्ध झाले होते, जे संपूर्ण जगासाठी आजही आदर्श आहे. महाराणा प्रताप यांनी अत्यंत शक्तीशाली अशा मोगल बादशाह अकबराच्या 85000 सैनिकांच्या विशाल सैन्या समोर आपल्या केवळ 20000 सैनिक आणि तोकड्या शस्त्रास्त्रांच्या आधारे अनेक वर्षे संघर्ष केला. सलग 30 वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही. एवढेच नाही तर, महाराणा प्रताप यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अकबरही रडला होता.


अकबरही रडला...
महाराणा प्रताप यांच्या युद्ध नीतीचे सर्वांनाच कौतुक वाटायचे. सगळीकडे त्याची स्तुतीही होत असे. त्यामुळेच या योद्ध्याचा मृत्यू झाला तेव्हा अकबरालाही रडू आले होते. हा राजा एवढा उदार होता की, युद्धात राणींना बंदी बनवल्यानंतर अत्यंत सन्मानाने तो त्यांना परत पाठवायचा. अत्यंत तोकडी शक्ती सोबत असूनही शत्रूसमोर मान झुकवणे पसंत केले नाही. वेळप्रसंगी जंगलात कंद मुळे खात त्यांनी युद्ध सुरू ठेवले. 


26 फुटांचा नाला केला चेतकने पार
जो सत्यासाठी लढत असतो त्याच्या विजयासाठी संपूर्ण सृष्टीच मदत करत असले असे म्हटले जाते. कारण महाराणा प्रताप यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचा घोडा चेतकही त्यांच्याबरोबर लढत होता. चेतक घोड्याच्या तोंडावर हत्तीची सोंड लावली जायची यावरूनच त्याच्या शक्तीचा अंदाज लावू शकता येतो. जेव्हा मोगलांची सेना त्यांचा पाठलाग करत होती, तेव्हा चेतकने 26 फुटांचा नाला एका उडीत पार केला होता. मोगलांच्या सैन्याला मात्र हा नाला पार करता आला नव्हता.


208 किलोच्या वजनासह लढायचे महाराणा
महाराणा प्रताप यांचा भाला 81 किलो वजनाचा होता. तर त्यांच्या छातीच्या कवचाचे वजन 72 किलो होते. भाला, कवच, ढाल आणि दोन तलवारींसह एकूण 208 किलोचे वजन घेऊन ते युद्ध करायचे. महाराणा प्रताप यांचे वजन 110 किलो आणि उंची 7 फूट 5 इंच एवढी होती.


पुढील स्लाइड्वर जाणून घ्या, राजा असूनही महाराणा प्रताप यांना जंगलांमध्ये का भटकावे लागले...तसेच जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची संपूर्ण कथा...

बातम्या आणखी आहेत...