आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वेळा खासदार अन् 4 वेळा आमदार, पहिल्यांदाच सांगितले 58 लग्नांचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अनितासह बागुन बाबू. बागुन मानतात की, एवढी लग्ने करून त्यांनी अनेक तरुणींना आपले नाव आणि नवे जीवन दिले. - Divya Marathi
पत्नी अनितासह बागुन बाबू. बागुन मानतात की, एवढी लग्ने करून त्यांनी अनेक तरुणींना आपले नाव आणि नवे जीवन दिले.

जमशेदपूर - बागुन सुंबरुई 1967 पासून 5 वेळा झारखंडच्या चाईबासामधून खासदार आणि 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. 83 वर्षीय बागुन यांना झारखंड-बिहार ते दिल्लीपर्यंत दोन विशेष आयडेंटिटी आहेत- हिवाळी, उन्हाळा असो वा पाऊस, ते एक धोती लपेटून राहतात आणि लग्ने इतकी केली की आकडा लक्षात नाही. तथापि, सांगितले जाते की त्यांनी 58 लग्ने केली आहेत. 

पण आता त्यांनी स्वत:च खुलासा केला आहे की, एवढी लग्ने का केली?

 

म्हणाले- पत्नींपैकी अनेक जणी मला सोडून गेल्या... 
बागुन एवढ्या लग्नांवर म्हणाले- पूर्वी येथे जत्रा-यात्रा लागायच्या यात फिरायला येणाऱ्या व्यावसायिक आदिवासी तरुणींचे शोषण करायचे. अनेक तरुणी प्रेग्नंट व्हायच्या. मोठे संकट उभे राहायचे. अशा तरुणींना मी माझे नाव देणे सुरू केले. त्यांना आधार दिला. अनेक तरुणींनी मी त्यांचा पती असल्याचे सांगून नोकरी मिळवली. मग त्यांना दुसरा कोणी साथीदार मिळाला, तर त्या मला सोडून गेल्या. अनेक मुली आयुष्यात आल्या अन् गेल्या. किती जणींची नावे लक्षात ठेवू? मला ना कुणी येण्यावर आक्षेप होता ना जाण्यावर!


1946 अ लव्ह स्टोरी: रेंजरच्या मुलीशी केला प्रेमविवाह...
- कोल्हान डिव्हिजनचे हेडक्वार्टर चाईबासाच्या गांधी टोलामध्ये राहणारे बागुन सुंबरुई यांची लव्ह स्टोरी अशी आहे की अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ शकते. 7वी पास बागुन आणि त्या वेळच्या मॅट्रिक पास दशमती सुंडी यांची कहाणी 1946 अ लव्ह स्टोरी आहे.
- दशमती करकट्टा येथील रहिवासी होत्या आणि बागन बुहधाचे राहणारे. दोन्ही कुटुंबांना नाते मंजूर नव्हते. दशमतीचे वडील रेंजर होते. त्यांनी गावातील लोकांना बागुन यांना मारहाण करायला सांगितले. बागुन यांना गावकऱ्यांनी घेरले, पण दशमतीला घेऊन बागुन चतुराईने पळून गेले. दोन्ही घरांत मोठा गोंधळ माजला, मग लग्न झाले.

- रेंजरने बागुन यांचे वडील मानकी सुंबरुईवर केस केली. मग बागुनने एका केसमध्ये सासऱ्यांना असे फसवले की, त्यांना पंचायतीत 8 वेळा जावई-जावई... म्हणावे लागले. यानंतर दशमतीच्या वडिलांनी त्यांचा जावई म्हणून स्वीकार केला. बागुनने मुक्तिदानी सुंबरुई आणि अनिता सोय यांच्याशीही लग्न केले. अनिता शिक्षिका आहेत आणि आता सध्या त्या सोबत राहतात.


मी भवरा आहे, कारण माझे फुलांवर प्रेम आहे
बागुन म्हणाले की, माझ्या नावाचा अर्थ सारगर्भित आहे. हो भाषेत 'बा' म्हणून फूल आणि 'गुन'चा अर्थ गुण. माझ्यात फुलाचा गुण आहे, म्हणून नाव आहे बागुन. मी भवराही आहे, कारण माझे फुलांवर प्रेम आहे. माझ्या घराच्या अंगणात गुलाबी आणि पांढरे गुलाब आहेत. या रोपट्यांना रुजवणाऱ्याचे नावही फूल आहे. फूलसिंह सोय. ती आजही माझ्यासोबत राहते.

 

बाबा रामदेव यांना भेटून माझ्या उघड्या शरीराचे रहस्य सांगेन...
-बागुन यांच्या शरीरावर वर्षभर धोतरच घालतात. बागुन म्हणाले की, एक धोतर घालून गांधीजींनी देशाला स्वतंत्र केले. विनोबा भावेही उघड्या अंगाने राहिले. मी बिहार, छत्तीसगड, प. बंगाल, ओडिशा यांना एकत्र करून झारखंडसाठी लढा दिला. तेव्हापासून उघड्या अंगानेच राहू लागलो. बाबा रामदेव यांनी माझ्या उघड्या अंगाचे रहस्य विचारले. त्यांना भेटून हे रहस्य सांगणार आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...