आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतच्या केशुभाईंचा समाजसेवेत पुढाकार, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उभारली 27 वसतिगृहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- सुरतमधील हिरा व्यापारी केशुभाई गोटी यांनी काही दिवसांपूर्वी आदिवासी भागातील शेतकऱ्यांची समस्या प्रसारमाध्यमात वाचली. समस्येचे गांभीर्य पाहता त्यांनी लगेच १०८ वसतिगृहे बनवण्याचा संकल्प केला. आतापर्यंत त्यांनी २७ वसतिगृहांची निर्मितीदेखील केली आहे. ८१ वसतिगृहांचे काम सुरू आहे. एक वसतिगृह बनवण्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. यातील ५० टक्के रक्कम केशुभाई स्वत: देतात तर उर्वरित रक्कम लोकांकडून जमा केली जाते.   


दक्षिण गुजरातच्या डांग, वलसाड, नवसारी, व्यारापासून दाहोदपर्यंत ते आदिवासी क्षेत्रात वसतिगृह बनवत आहेत. स्वत:ला करावा लागलेला संघर्ष इतर गरीब, होतकरू मुलांना करावा लागू नये म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. एकेकाळी त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. परंतु आज केशुभाई यांचा कोट्यवधींचा हिऱ्याचा व्यवसाय आहे. १९७२ मध्ये केशुभाई हिऱ्याचे काम करण्यासाठी मुंबईला गेले. त्या वेळी प्रवासाचे पैसे आणि अंगावर धड कपडेही नव्हते. त्या वेळी त्यांच्या एका नातेवाइकाने मदत केली. मुंबईमध्ये हिऱ्याशी संबंधित काम शिकल्यानंतर ते सुरतला परतले. तेथे एका कंपनीत नोकरी मिळाली. पण नोकरी टिकली नाही. आपल्याकडे जमलेल्या तुटपुंज्या रकमेतून त्यांनी सुरतमध्ये छोटासा हिऱ्यांचा कारखाना सुरू केला. आज त्यांच्या कारखान्यात ५०० कारागीर काम करतात. व्यवसायाची उलाढाल २०० कोटींपर्यंत पोहोचली आहे. सुरत, वल्लभीपूर, डांगमध्ये २५ पेक्षा अधिक सामाजिक संस्थांशी ते जोडले गेले आहेत. आई काशिबा हरिभाई गोटी यांच्या नावाने सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून केशुभाई गरजू लोकांची मदत करत आहेत. 

 

मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा म्हणून... 
केशुभाई म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून मी भूमिपुत्र मासिक वाचत आहे. या वेळी मी शेतकरी व भूमिहीनांवर लेख वाचला. त्यांची समस्या भीषण आहे. बालपणीपासून माझ्यावर विनोबा भावेंच्या विचारांचा पगडा आहे.  त्यामुळे गरीब, गरजूंची मदत करणे मी कर्तव्य समजतो. मानवतानी महेक सेवा मंडळासोबत आदिवासी वसतिगृहात पौष्टिक आहार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो....

बातम्या आणखी आहेत...