आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमधील नाराज नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढू : मल्लिकार्जुन खरगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकमधील असंतुष्टांच्या कारवाया रोखण्यासाठी कर्नाटक मंत्रिमंडळातील सहा रिक्त जागा भरण्यासाठी आपण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहोत. नाराज नेत्यांशीही चर्चा करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी वृत्तसंस्थेला दिली.


कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. बी. पाटील आणि सतीश जरकीहोळी यांनी निराशा व्यक्त केली होती. तसेच रोशन बेग, एन. ए. हॅरिस, रामलिंग रेड्डी, एच. के. पाटील हे ज्येष्ठ नेतेही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अस्वस्थ आहेत. त्या पृष्ठभूमीवर खरगे यांचे हे वक्तव्य आले आहे.


असंतुष्ट नेत्यांचा राग शांत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस यांची काय योजना आहे, या प्रश्नावर खरगे म्हणाले की, आमचे पक्षश्रेष्ठी या नेत्यांशी चर्चा करून काही दिवसांतच त्यावर तोडगा काढतील. पक्षाचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल आणि गुलाम नबी आझाद हे दोघेही जण या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे योग्य तो तोडगा निघेल,अशी खात्री आहे. काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी ते निष्ठावंत आहेत. त्यांनी पक्ष सोडून जाण्याची भाषा बोलून दाखवलेली नाही. याउलट त्यांनी पक्ष भक्कम करण्याचाच विचार बोलून दाखवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...