आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूमध्ये आमदारांच्या वेतनात तब्बल 91% वाढ; दरमहा मिळणार 1.05 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूत एक आठवड्यापासून एसटी कर्मचारी बंद पाळत आहेत. वेतनवाढीची त्यांची मागणी आहे. - Divya Marathi
तामिळनाडूत एक आठवड्यापासून एसटी कर्मचारी बंद पाळत आहेत. वेतनवाढीची त्यांची मागणी आहे.

चेन्नई- तामिळनाडूच्या आमदारांच्या वेतनात सुमारे ९१% वाढ झाली आहे. आता त्यांना दर महिन्यात १.०५ लाख रुपये वेतन मिळेल. आधी ५५ हजार रुपये मिळत होते. मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी बुधवारी विधानसभेत आमदारांच्या वेतनवाढीचे विधेयक सादर केले. ते मंजूरही झाले. तामिळनाडूत २३४ आमदार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार स्थानिक क्षेत्रविकास निधीही २ कोटींवरून वाढवून २.५ कोटी रु. करण्यात आला आहे. माजी आमदारांच्या निवृत्तिवेतनात २० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.  


विरोधकांचा विरोध

तामिळनाडूचे शेतकरी दिल्लीत आणि बस कर्मचारी राज्यात वेतनवाढीसाठी एक आठवड्यापासून आंदोलन करत आहेत. अशा वेळी आमदारांचे वेतन दुप्पट करण्यात आले आहे. द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकाला विरोध करताना म्हटले की, आमदारांचे वेतन वाढवल्यास लोक खिल्ली उडवतील. 

 

तेलंगणच्या आमदारांना सर्वात जास्त २.५० लाख रुपये आहे वेतन  

भारतात ३१ राज्यांत (केंद्रशासित प्रदेशांसह) ४,१२० आमदार आहेत. त्यांचे सरासरी वेतन १.१५ लाख रुपये आहे. ७ वर्षांत आमदारांच्या सरासरी वेतनात सुमारे १२५% वाढ झाली आहे. सर्वाधिक २.५० लाख रु. वेतन तेलंगणच्या आमदारांचे आहे. दिल्लीत २.१० लाख रुपये वेतन मिळते. सर्वात कमी ३४ हजार रु. वेतन त्रिपुराच्या आमदारांना मिळते.  

 

> आमदारांना सर्वात कमी ३४ हजार वेतन त्रिपुरात, तर नागालँडमध्ये ३६ हजार रु. 

> वेतनात सर्वाधिक ४५०% वाढ दिल्लीत आणि १७०% तेलंगणात झाली 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, देशातील सर्व ३१ राज्यांच्या आमदारांचे वेतन... 

बातम्या आणखी आहेत...