आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्‍या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने केले असे; म्‍हणाली, टॉयलेटमध्‍ये केला रेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिडीत विद्यार्थीनीवर सध्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. - Divya Marathi
पिडीत विद्यार्थीनीवर सध्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

ललितपूर (उत्‍तरप्रदेश)- 9वीच्‍या विद्यार्थीनीचा शाळेतील शिक्षकानेच बलात्‍कार केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. 20 डिसेंबररोजी ही घटना घडली. मात्र शिक्षकाने धमकावल्‍यामुळे या 13 वर्षीय विद्यार्थीनीने कोणालाही याबाबत सांगितले नाही. अखेर तिनेच लिहिलेल्‍या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण आता समोर आले आहे.

 

(पुढील स्‍लाइडवर वाचा, पिडीतेची सुसाईड नोट)

 

- उत्‍तरप्रदेशमधील ललितपूर येथील सरदर पटेल आंबेडकर इंटर कॉलेमध्‍ये 20 डिसेंबररोजी ही घटना घडली.
- पिडीत विद्यार्थीनी (13) दुपारी 12 वाजता तिस-या तासिकेदरम्‍यान टॉयलेटला गेली होती. तेव्‍हाच शाळेत इग्रंजी विषय शिकवणारे शिक्षक राजकुमार उर्फ कल्‍लू महाराज (45) तेथे गेले आणि विद्यार्थीनीवर बलात्‍कार केला.
- मुलीने आरडाओरडा करण्‍याचा प्रयत्‍न करताच शिक्षकाने तिचे तोंड दाबले व याबद्दल कोणाला सांगितल्‍यास जीवे मारण्‍याची धमकी दिली.


काय म्‍हणाली पिडीतेची आई?
- पिडीतेच्‍या आईने सांगितले आहे की, 'शाळा सुटल्‍यानंतर ती घरी आली. मात्र भितीमुळे 2 दिवस तिने काहीही सांगितले नाही.'
- 23 डिसेंबररोजी सकाळी 5 वाजता विद्यार्थीनीने विष पिऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. त्‍याआधी तिने एक चिठ्ठी लिहिजी. जी आता पोलिसांच्‍या हाती लागली आहे.
- पिडीतेवर सध्‍या येथील जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

 

काय म्‍हणतात अधिकारी?
- ज्‍या परिसरात ही घटना घडली त्‍या महरौनी पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक जयप्रकाश राम यांनी सांगितले आहे की,  'या प्रकरणाचा तपास सुरु करण्‍यात आला आहे. पोलिस पिडीतेचा जबाब घेत आहेत. तक्रारीची नोंद होताच पुढील कारवाई केली जाईल.'

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सुसाईड नोट आणि फोटो...   

बातम्या आणखी आहेत...