आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teacher Of A Private English Medium School In Kolkata Detained After A Class 2 Student Alleged That He Had Molested Her.

दुसरीच्या विद्यार्थिनीचे शोषण, शिक्षकाला अटक; काेलकात्यातील इंग्रजी शाळेतील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- एका खासगी इंग्रजी शाळेतील शिक्षकास दुसरीच्या वर्गातील मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेबाहेर निदर्शने करत शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, या मुलीचे शाळेतील एका नृत्यशिक्षकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप  पीडितेच्या पालकांनी केला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून मुलीने पालकांना ही घटना सांगितली. शाळेच्या व्यवस्थापनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही आंदोलनात सहभागी झालेल्या एका पालकाने केला. आरोपी शिक्षकास पालकांनी बेदम मारहाणही केली. परंतु पोलिसांनी शिक्षकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. याच शाळेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोन शिक्षिकांनी एका चार वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...