आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या मैदानावर टीम इंडिया गत अाठ वर्षांपासून श्रीलंकेविरुद्ध सलग विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला- कसाेटी मालिका जिंकल्यानंतर यजमान टीम इंडिया अाता अापल्या घरच्या मैदानावरील श्रीलंकेविरुद्धची वनडेतील विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी उत्सुक अाहे. भारताने अातापर्यंत अाठ वर्षांत पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध अापल्या घरच्या मैदानावरील वनडेत विजयी पताका फडकवली अाहे. अाता हीच लय अागामी वनडे मालिकेतही कायम ठेवण्याचा मानस यजमान टीम इंडियाचा अाहे. युवा फलदंाज राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अाता वनडे मालिका खेळणार अाहे. रविवारपासून भारत अाणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. यातील सलामीचा वनडे सामना धर्मशाला येथील मैदानावर रंगणार अाहे. यासाठी राेहितच्या नेतृत्वात युवांचे खेळाडू सज्ज झाले अाहेत. नुकतीच यजमान भारताने  १- ० ने श्रीलंकेविरुद्धची तीन कसाेटी मालिका जिंकली.  


परेरा श्रीलंकेचा सातवा कर्णधार

सातत्याने कर्णधार मालिकांमध्ये फ्लाॅप ठरत अाहे. हीच बाब लक्षात घेऊन श्रीलंका क्रिकेट मंडळाने युवाच्या हाती नेतृत्वाची धुरा साेपवण्याचा निर्णय घेतला. यातून तिसारा परेराची कर्णधारपदी निवड झाली. यामुळे परेरा हा श्रीलंकन टीमचा सातवा कर्णधार ठरला. यापूर्वी मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, थिरिमाने, थरंगा, कपुगेदरा अाणि मलिंगाचा समावेश अाहे. या सर्वांनी वनडे टीमचे नेतृत्व केले हाेते. अाता त्याच्यावर खास नजर असेल. 


अाता नंबर वनची संधी

यजमान टीम इंडियाला अाता अायसीसीच्या वनडेमध्ये नंबर वन हाेण्याची माेठी संधी अाहे. यासाठी टीमला अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या श्रीलंका संघाचा सुपडासाफ करावा लागेल. म्हणजे ही तीन वनडे सामन्यांची मालिका ३-० ने जिंकल्यास भारताला माेठा फायदा हाेईल. यातून टीम इंडिया नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान हाेईल. 

 

१५५ वनडे अातापर्यंत भारत-श्रीलंका यांच्यात झाले   
- ८८ वनडेत भारताचा विजय, ५५ वनडे श्रीलंकेने जिंकले  
- ३३० धावांची धर्मशालेत टीमची खेळी. भारताने २०१४ मध्ये विंडीजविरुद्ध हा स्काेअर केला हाेता.   
- १२७ धावांची वैयक्तिक सर्वाेच्च खेळी काेहलीने विंडीजविरुद्ध केली.

 

धर्मशालेत भारताची २-१ ने अाघाडी

सलामीचा वनडे सामना धर्मशालेत रंगणार अाहे. येतील मैदानावर भारताचे पारडे जड मानले जाते. कारण या ठिकाणी अातापर्यंत यजमान भारताने तीन वनडे सामने खेळले. यात भारताचे २-१ असे विजयाचे रेकाॅर्ड अाहे. भारताला या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते.   

 

नव्या नेतृत्वात दाेन्ही टीम मैदानावर

वनडे मालिकेसाठी भारत अाणि श्रीलंका या दाेन्ही संघांच्या नेतृत्वात बदल करण्यात अाला अाहे. विश्रांतीमुळे काेहलीकडील नेतृत्वाची धुरा राेहितकडे साेपवण्यात अाली. श्रीलंका क्रिकेट मंडळाने अापल्या वनडे टीमच्या नेतृत्वात बदल केला. यातून परेराकडे कर्णधारपद देण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...