आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजप्रताप म्हणाले, तेजस्वीला राजदचा युवराज केले; पण माझ्या पदरी पडला अपमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात आता मानापमानावरून दोन भावांत गृहयुद्ध छेडले गेले आहे. लालूप्रसाद यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी लहान भाऊ आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात तोफ डागली आहे.  तेजप्रताप म्हणाले, मी तेजस्वीला राष्ट्रीय जनता दलाचा युवराज म्हणून घोषित केले. पण त्या  बदल्यात माझ्या पदरी अपमानास्पद वागणूक आली. त्यांनी टि्वट करून राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा जाहीर केली आहे. आता पक्ष पापांनी चालवला तरच काही योग्य ठरेल. काही असामाजिक तत्त्वे भावा-भावात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले. पण कोणाचे नाव घेतले नाही. वाचा तेजप्रताप यांचे मनोगत...  

 

असामाजिक तत्त्वांची बजबजपुरी झालाय राजद, आता पक्ष लालूंनीच चालवावा

मी माझ्या लाडक्या तेजस्वीला राजदचा युवराज घोषित केले. परंतु बदल्यात फक्त अपमान माझ्या पदरी पडला आहे. काही लोक आम्हा दोन भावांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षात कोणी माझे ऐकत नाही. राजदचे नेते माझ्या फोनला प्रतिसाद देत नाहीत. मी अर्जुनाकडे हस्तिनापूर सोपवून द्वारकेला जाऊ इच्छितो. परंतु काही चहाडखोरांना मी किंगमेकर असल्याचा त्रास होईल. माझी व्यथा माझी पत्नी ऐश्वर्या राय हिला सांगितली. तिला ऐकून धक्का बसला. राजदचे कार्यकर्ते पक्षासाठी निष्ठेने काम करतात.

 

स्वत:चा पैसा खर्चून जनतेची सेवा करतात. पण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. राजेंद्र प्रसाद नावाच्या एका नेत्यास पक्षात महत्त्वाचे पद देण्यासंबंधी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामचंद्र पूर्वे यांना सांगितले. पण त्यांनी माझे ऐकले नाही. तेजस्वीला बोलून काही फायदा नाही. शेवटी मी वडिलांशी (लालूप्रसाद ) व आई (राबडीदेवी) यांच्याशी चर्चा केली.तेव्हा काही मार्ग निघाला. राजदमध्ये असामाजिक तत्त्वांचा भरणा झाला आहे.  लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांच्यासोबत माझे,  तेजस्वी यादव व मिसा भारतीचे नाव काही नेते विकत आहेत. अशा नेत्यांची संख्या वाढते आहे. असे नेते पक्ष बुडवायला निघाले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...