आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात हल्ला करत केली पाकिस्तानी अतिरेक्याची सुटका; दोन पोलिस शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/जम्मू- लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी मंगळवारी श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात पोलिसांवर गाेळीबार करून एका पाकिस्तानी अतिरेक्याची सुटका केली. हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले. दरम्यान, ज्याच्या सुटकेसाठी हा हल्ला करण्यात आला तो नावीद जट्ट ऊर्फ अबू हंजाल जुन्या शहरातील गल्ल्यांतून पसार झाला. गेल्या दोन दशकांत काश्मिरात रुग्णालयावर झालेला हा पहिलाच हल्ला आहे.


दहशतवाद्यांच्या अटकेसाठी हाय अलर्ट घोषित करण्यात अाल्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले. २२ वर्षीय पाकिस्तानी अतिरेकी जट्ट याला २०१४ मध्ये कुलगाममधून अटक केली  होती. त्याच्यासह इतर ५ कैद्यांना काश्मीरबाहेरील तुरुंगात हलवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, २६ डिसेंबरला सत्र न्यायालयाने परवानगी दिली नव्हती. 
पार्किंगमध्ये वाट पाहत होते अतिरेकी : मध्य काश्मीरचे पोलिस महासंचालक गुलाम हसन भट यांनी सांगितले, जट्ट याच्यासह सहा कैद्यांना रुग्णालयात अाणले हाेते. प्रत्यक्षदर्शीनुसार रुग्णालयाच्या  काका सराय भागात अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हे अतिरेकी पार्किंगमध्ये उभे होते. पोलिसांची व्हॅन आल्यानंतर पाच कैद्यांसह जट्ट व्हॅनमधून उतरताच दडून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला.

 

अनेक अतिरेकी कारवायांत जट्टचा हात

 

लष्कर-ए-ताेयबाचा अतिरेकी नावीद जट्ट मूळ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुलतानचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये अनेक अतिरेकी कारवायांत त्याचा हात आहे. हैदरपुरामध्ये लष्करावर तसेच महामार्गावर सिल्व्हर स्टार हॉटेलवर झालेल्या हल्ल्यातही तो सहभागी होता. पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या छावण्यांवर झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात होता.

 

दाेन वर्षांत पोलिसांसह १२० लोकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत अतिरेकी हल्ल्यांत पोलिसांसह १२० लोकांचा मृत्यू झाला तर ३०८ जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. २०१६ मध्ये २० आणि २०१७ मध्ये १७ पोलिस मारले गेले आहेत. तर, २०१७ मध्ये ५१ नागरिक आणि ३२ पोलिस मारले गेले.

 

बंदूक हिसकावून केला गोळीबार
अतिरेकी जट्ट व्हॅनमधून उतरल्यानंतर गाेळीबार सुरू होताच जट्टनेही एका पोलिसाची बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. पोलिसांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयारीची संधी न देता अतिरेकी गोळीबार करत शहरातील गल्ल्यांतून पळून गेले. या हल्यात कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद, बाबर अहमद शहीद झाले.

 

हायटेक अतिरेकी

२६ ऑगस्ट २०१४ रोजी अतिरेकी जट्ट याला अटक करण्यात आली होती. त्याने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले आहे. जीपीएस, वायरलेस आणि मोबाइलवर स्काइपचा वापर करण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...