आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांना दहशतवाद्यांकडून निधी- शिया वक्फ बोर्डाचे पत्र; शैक्षणिक दर्जाबाबत चिंता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बाेर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मदरशांना संपुष्टात अाणण्याचे समर्थन करून मदरशांतील शिक्षणाला मुख्य प्रवाहाशी जाेडण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहून केली अाहे.


काही संघटना व कट््टरपंथी मुस्लिम समाजातील मुलांना केवळ मदरशांतून शिक्षण देऊन सर्वसामान्य शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर नेत अाहेत. मदरशांत मुलांना खालच्या दर्जाचे शिक्षण मिळत अाहे. परिणामी, ही मुले समाजापासून दूर हाेऊन भरकटून जातात व नंतर कट्टरपंथाकडे वळतात. त्यामुळेच मदरशांना संपुष्टात अाणण्याची गरज असून, त्या जागी सामान्य शिक्षणाचे धाेरण तयार केले जावे. तसेच किती मदरशांतून डाॅक्टर, अभियंते, अायएएस अधिकारी निर्माण झाले अाहेत? असा प्रश्न उपस्थित करून काही मदरशांनी मात्र दहशतवादी जन्माला घातले असल्याचेही त्यांनी म्हटलेय. मदरशांतून शिकलेले तरुण राेजगाराबाबत कुचकामी ठरतात, ही वास्तवता अाहे. त्यांच्या पदव्यांना कुठेही मान्यता मिळत नाही.
विशेषत: खासगी क्षेत्रातील राेजगारात तर मदरशांतील शिक्षणाला काेणतेही स्थान नसते. अशाने संपूर्ण समुदाय समाजासाठी हानिकारक बनताे, असेही त्यांनी पत्रात म्हटले अाहे. 

 

रिझवींनी स्वत:चा अात्मा अारएसएसला विकला : अाेवेसी
दरम्यान, या पत्रावर प्रतिक्रिया देताना एअायएमअायएमचे प्रमुख असदुद्दीन अाेवेसी यांनी रिझवी यांच्यावर टीका केली अाहे. रिझवींनी स्वत:चा अात्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विकला असल्याचे म्हटलेय. त्यांनी पत्रात म्हटल्याप्रमाणे असा एक तरी मदरसा दाखवावा, जेथे अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, असे अाव्हान देऊन याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास ते गृहमंत्र्यांकडे द्यावेत, असेही अाेवेसी यांनी म्हटले आहे.

 

दहशतवादी संघटना पुरवतात निधी

बहुतांश मदरशांना जकातीच्या माध्यमातून निधी मिळत असताे. हा निधी भारत, बांगलादेश व पाकसारख्या देशांतून येताे. यासह काही दहशतवादी संघटनाही मदरशांना पैसा पुरवत असतात. मुस्लिमबहुल भागातील मदरशांना साैदी अरबमधून पैसे पुरवण्यात येतात. त्यामुळे याची चाैकशी झाली पाहिजे.

 

बातम्या आणखी आहेत...