आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड हल्ल्यातील पीडितेचा ‘व्हॅलेंटाइन डे’ ला साखरपुडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अॅसिड हल्ल्यातील पीडिता प्रमोदिनीचा ‘व्हॅलेंटाइन डे’ सार्थकी लागला. सुरेश साहू या तिच्या जुन्या मित्राशी बुधवारी तिचा साखरपुडा झाला. २००९ मध्ये ओडिशातील जगतपूर येथील प्रमोदिनीवर एका तरुणाने अॅसिड फेकले होते. यात ती ८० टक्के जळाली होती, तिची दृष्टीही अधू झालेली होती. तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला. ५ वर्षे ती अंथरुणावर होती.  २०१४ मध्ये वैद्यकीय प्रतिनिधी साहूने तिला धीर दिला. तिच्यावर उपचार केले आणि २० टक्के दृष्टीही मिळवून दिली. तिला भक्कम आधार दिला. अॅसिड हल्ला थांबवण्यासाठी दिल्लीतील “शेरोज हँगआऊट कॅफे’ने  चळवळ सुरू केली आहे. या कॅफेत प्रमोदिनी व साहू यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कॅफेचे निमंत्रक आलोक दीक्षितांनी साखरपुड्याची तयारी केली. पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डे रोजी म्हणजे याच तारखेला त्यांचे लग्न हाेईल.
बातम्या आणखी आहेत...