आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ प्रकरणातील सात जणांवर आरोपपत्र निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोट - जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पठाणकोट जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आठपैकी सात आरोपींवर गुरुवारी आरोपपत्र निश्चित केले. 


 या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी ती जम्मू आणि काश्मीरच्या बाहेर पंजाबमधील पठाणकोट येथे हलवण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी जम्मू आणि काश्मीरबाहेर पठाणकोट येथे करावी, असा निर्णय दिला होता. त्याचबरोबर सुनावणी दररोज व्हावी आणि ती इन-कॅमेरा व्हावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.  ३१ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू झाली होती. त्या दिवशी सात आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले होते.  


या प्रकरणी गुन्हे शाखेने १५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, अल्पसंख्याक भटक्या समुदायाच्या मुलीचे या वर्षी १० जानेवारीला अपहरण करण्यात आले होते. कठुआ जिल्ह्यातील एका गावातील मंदिरात तिला बंधक ठेवून अत्याचार करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...