आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमशेदपूर (झारखंड)- येथे पोटकाच्या मोहलडीहा गावात सोमवारी एका 4 वर्षाच्या मुलाच विवाह एका कुत्रीसोबत लावून देण्यात आला. या लग्न सोहळात गावकरी वऱ्हाडी बनले तर लग्नाच्या सर्व विधी मुलाच्या आईने पार पाडल्या. एखाद्या कुत्रीसोबत मुलीचे लग्न लावून दिल्यास त्याचे आरोग्य व्यवस्थित राहिल असा सल्ला गावकऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना दिला होता. यानंतर हा लग्न सोहळा पार पडला.
- अनिलची आई सरस्वती सरदार यांनी सांगितले की, मुलीची तब्बेत नेहमी खराब राहत होती. लोकांनी सांगितले की, एखाद्या कुत्रीसोबत त्याचे लग्न लावून दिल्यास त्याचे आरोग्य सुधारेल.
- यानंतर लग्नासाठी शुभ दिवस पाहण्यात आला. अखान जत्रेच्या दिवसी शुभ कार्य संपन्न होत असते. यामुळे लग्नासाठी हाच दिवस ठरवण्यात आला.
- सोमवारी लग्नाच्या विधी पार पाडण्यासाठी गावातील सर्व महिला चौकात एकत्र आल्या. मुलाने कुत्रीला वरमाळा घातली आणि सिंदूर भरला आणि लग्नाच्या सर्व विधी पार पाडल्या.
- गांवच्या नंदलाल मांझी यांनी सांगितले की मुलाचे 10 महिण्यात दात निघाले आणि ते वरील जबड्यातील असेल, तर ते अपशकुन समजले जाते. मुलासोबत देखील असेच झाले होते.
झारखंडमध्ये यापूर्वी देखील असे लग्न लावण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी अंधविश्वासाच्या आहारी जाऊन एका 18 वर्षाच्या मुलीचे कुत्र्यासोबत लग्न लावण्यात आले होते. गावातील एका बाबाने मुलीवर प्रेत-आत्म्याची सावली असल्याचे सांगितले होते. या मुलीमुळे गावाला धोका आहे अशी भीती बाबाने कुटुंबीयांच्या मनात भरवली होती. या आपत्तीपासून वाचण्यासाठी कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी तरूणीचे लग्न एखाद्या तरूणाशी करण्याआधी एका कुत्र्यासोबत लावले होते.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.