आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्याने त्रिकूट पर्वतावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले, वैष्णोदेवी यात्रा सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू / डेहराडून - सैन्याने बुधवारी जम्मूच्या त्रिकूट पर्वतावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर व २०० हून अधिक सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. वणव्यामुळे रोखण्यात आलेली वैष्णोदेवी यात्रा मार्ग गुरुवारी पूर्ववत झाला. यात्रा पुन्हा सुरू झाल्यामुळे कटरामध्ये अडकलेल्या २५ हजार भाविकांना दिलासा   मिळाला. दुसरीकडे उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातील वणवा पसरत चालला आहे. 

 

हिमाचल|९ दिवसांत १००० घटना
उत्तराखंडमध्ये १५ मे पासून आतापर्यंत जंगलात ३ हजारांवर वणव्याच्या घटना घडल्या. १२७३ हेक्टर क्षेत्रात आगीचे साम्राज्य पसरलेे. हिमाचलात १ हजारांवर आगीच्या घटना घडल्या. गतवर्षाच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आहे.

 

वणवा का पेटला ?|

डोंगराळ राज्यांमध्ये तापमान ३ ते ५ अंश सेल्सियसने जास्त आहे. उत्तराखंडमध्ये पारा ४० अंश सेल्सियस आहे. जंगले शुष्क झाली आहेत.

 

१२५ टक्क्यांनी वाढ
गत १६ वर्षांत (२००३-१७) वणव्यात ४६ टक्क्यांनी वाढल्या. २०१५-१७ मध्ये १२५ टक्क्यांनी, तर १५ हजार ९३ वरून ३५ हजार ८८८ वर.

 

३३ राज्यांत आगीच्या घटना घडल्या. वार्षिक सरासरी ५५० कोटी रुपयांची हानी वणव्यांमुळे होते.

 

बातम्या आणखी आहेत...