आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत गाडी चालवणाऱ्यांवर करा हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा : लाहोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीअाय) चंदिगड येथे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात रस्ते अपघातात होणारे नुकसान देशाच्या विकास दरवाढीच्या तीन टक्के इतके असते. एकचतुर्थांश लोकसंख्या त्यांच्या उत्पन्नाचा ३० टक्के हिस्सा रस्ते अपघातानंतर उपचारावर खर्च करतात. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी यांनी गुरुवारी इंडियन ऑर्थोपेडिक्स असोसिएशनच्या (आयएओ) वार्षिक परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी बोलताना केले. ट्रॉमा आणि त्याच्या व्यवस्थापनावर भाषणात त्यांनी भर दिला.  ते म्हणाले, पीजीआय चंदिगडद्वारे २०१५-१६ मध्ये सहा राज्यांत तीन हजार रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार या अपघातात पीडितांना औषधांसह इतर बाबींवर १७ हजार ८५० रुपये सरासरी खर्च येतो. याचबरोबर उत्पादकता घटते. हे नुकसान माणसी ३३ लाख रुपये इतके आहे. यात १५ टक्के लोक एका वर्षात मृत्युमुखी पडतात. दहापैकी सात लोकांना उपचाराचा खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. जखमींवर उपचारादरम्यान सरासरी  १७ हजार ८२० रुपये औषधांसाठी खर्च येतो.  


प्रत्येक जिल्ह्यात एक ट्रॉमा सेंटर असावे  
आयओएचे माजी अध्यक्ष डॉ. राजशेखरन यांनी २०१४ मध्ये याच मुद्द्यावर याचिका दाखल केली होती, याचा उल्लेख करत न्या. लाहोटी यांनी राजशेखरन यांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालय प्रकरणांवर देखरेख करते आहे. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी काही आदेशही दिले आहेत. यात रस्ते सुरक्षा योजना, रस्ते सुरक्षा निधी व रस्ते सुरक्षा कृती योजना व जिल्हा रस्ते सुरक्षा समिती स्थापन केली आहे. 


डॉ. लाड यांना जीवन गौरव पुरस्कार  
संघटनेकडून देण्यात येणारा सर्वोच्च असा जीवन गौरव पुरस्कार अस्थिरोग तज्ज्ञ व पद््मभूषण डॉ. एन. एस. लाड (मुंबई) यांना देण्यात आला. दुसरा सर्वोच्च सन्मान ऑनररी फेलो पुरस्कार इंदूरच्या इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक कन्सर्नचे चेअरमन डॉ. डी. के. तनेजा, ब्रिटिश ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आँडेर(तुर्की)आणि आयर्लंडचे डॉ. आनंदा महापात्र  यांना देण्यात आला.  डॉ. बी. एन. सिन्हा गुणवत्ता पुरस्कार मुंबईचे डॉ. अशोक जोहरी व बंगळुरूचे डॉ. राजीव नाईक यांना देण्यात आला.


रस्त्यावर स्पर्धा करणाऱ्यांवर झीरो टॉलरन्स ठेवा  
१ घटनास्थळी पोलिस, रुग्णवाहिका आणि छायाचित्रकार तीन ते पाच मिनिटांत पोहोचावेत.  
२. ट्रॉमा सेंटर सुसज्ज असावे. आयओएने कार्यकर्त्यांची भूमिका बजावावी.  

बातम्या आणखी आहेत...