आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिराेलीपाठोपाठ छत्तीसगडमध्येही सहा महिलांसह दहा नक्षल्यांचा खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजापूर - महाराष्ट्रातील गडचिराेलीपाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला. छत्तीसगड-तेलंगण सीमेपासून १३ किमीवर ग्रे हाउंड तुकडीने छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने इरमिडी भागाची नाकेबंदी करून नक्षलवाद्यांवर हल्लाबोल केला. ग्रे हाउंड फोर्सने १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

 

चकमकीत ३ जवानही जखमी झाले. जवानांनी ८ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. यात ६ महिलांचा समावेश आहे. संध्याकाळी उशिरा एडीजी डी.एम. अवस्थी यांनी कारवाईत ६ महिला आणि दोन पुरुषांना टिपले गेल्याचे सांगितले. ते म्हणाले, या मोहिमेत तेलंगण ग्रे हाउंड आणि छत्तीसगड पोलिस ज्यात एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा जवानांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...