आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ पाठवले; राजस्थानात घडलेली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- राजस्थानातील बरण जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्काराचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड करण्यात आल्याची तक्रार महिलेने पोलिसांत केली. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली असून बलात्काराचा व्हिडिओ अपलोड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडितेने ५ मार्च रोजी महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी सहा तरुणांवर गुन्हा नोंदवला असून अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.  


पीडिता कोट्याजवळील एका ढाब्यावर काम करते. चेतन मीना (२१) या पीडितेच्या परिचयातील तरुण मोटारसायकलवरून तिला गावी नेऊन सोडण्यास तयार झाला. वाटेत एका निर्जन ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान इतर ५ तरुण तेथे आले. त्यांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे चित्रीकरण केले गेले.   अारोपींनी पीडितेला तिच्या सासरी दुसऱ्या दिवशी नेऊन सोडले. तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...