आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे देशातील सर्वाधिक पूरग्रस्त गाव, दोन वर्षांनी नवे घर बांधतात आणि राहतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोसीची पाणीपातळी वाढल्यामुळे बिकारच्या सुपौल जिल्ह्यातील आसनपूर नरहिया ४ महिने पाण्याखाली असते. - Divya Marathi
कोसीची पाणीपातळी वाढल्यामुळे बिकारच्या सुपौल जिल्ह्यातील आसनपूर नरहिया ४ महिने पाण्याखाली असते.

सुपौल (बिहार)- बिहारच्या सुपौलपासून १२ किमी अंतरावरील काेसी नदीमध्ये  आसानपूर नरहिया गाव वसलेले आहे. पावसाळ्यात चार महिने गावाचा देशाशी संपर्क तुटतो. घरे, शाळा बुडतात. पण येथील लोकांनी यातूनही मार्ग काढून आपले जीवन सुरळीत सुरू ठेवले आहे. जमीन न सोडण्याची जिद्द परिस्थितीशी झगडण्याचे बळ देत आहे.  


या जिद्दीची व यशाची गोष्ट जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीची टीम आसानपूर नरहिया गावात गेली. वाटेत पन्नाशी गाठलेले उपेंद्र पंडित भेटले. ते म्हणाले, नदीमध्ये जो पाइप दिसतो तो बोअरिंगचा आहे. आता १५ दिवसांपूर्वी  घर  कोसी नदीच्या पुरात वाहून गेले. आता नवे घर बांधणार आहोत.  बलराम पंडित याने सांगितले, एक-दीड हजार लोकसंख्येच्या या गावात ही समस्या सर्वांनाच भेडसावते. कारण कोसी नदीच्या प्रवाहाची दिशा नेहमी बदलत असते. जून ते सप्टेंबर महिन्यात उ गाव पाण्याखाली गेलेले असते. सर्वत्र संपर्क तुटलेला असतो. गावातील आणखी एक गावकरी रणजित पासवान सांगतात, पावसाळा सुरू होण्याआधीच कुटुंबे मचाण बांधण्यास सुरुवात करतात. चार महिने संसार बांबू व पत्र्याच्या मचाणावर थाटलेला असतो.  


गावातील माजी पंचायत सदस्य छुतहर पासवान सांगतात, जवळच असलेल्या चार क्रमांकाच्या धरणाला २५ फूट खालून कोसी नदीचा प्रवाह धडकतो. यामुळे धरणातील मातीची धूप थांबवण्यासाठी बांबूचा भराव टाकला नाही तर काेसी धरण फुटण्याची भीती आहे. धूप रोखण्यासाठी सरकारकडूनही काही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे त्यांची वाट न पाहता गावकऱ्यांनी बांबूचा भराव टाकणे सुरू केले आहे. कोसी नदीच्या काठावरच प्राथमिक शाळा आहे. १५ दिवसांपूर्वी या शाळेचा एक भाग वाहून गेला आहे.  


कमलेश साव यांनी सांगितले, गावात वीज नाही. शाळा नाही. पुढील शिक्षणासाठी मुलांना १० किलोमीटर दूर सुपौलला जावे लागते. ही मुले नावेतून जातात. गावात तीन नावा आहेत. यातून आजारी लोकांना रुग्णालयात नेण्या-आणण्याचे काम करावे लागते. पूर  नसतो तेव्हा गावकरी येथील जमिनीत मका, मोहरी आणि गव्हाचे पीक काढतात.

बातम्या आणखी आहेत...