आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा बायकोला अधिकार, हायकोर्टाचा निर्वाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर - पतीचा पगार किती आहे, हे पत्नीला जाणून घेण्याचा हक्क असल्याचा निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. न्यायमूर्ती एस.के. सेठ व न्या. नंदिता दुबे यांच्या पीठाने याचिकाकर्त्या सुनीता जैन यांना आरटीआय अंतर्गत पतीची पे-स्लिप (पगारपत्रक) देण्याचे निर्देश दिले.

 

कोर्ट म्हणाले, पत्नीला ‘थर्ड   पार्टी’ समजून पतीच्या पगाराबाबतची माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही. याचिकेनुसार, सुनीता व पती पवन जैन यांच्यांत तणाव सुरू आहे. पती बीएसएनएलमध्ये असून मासिक वेतन सव्वादाेन लाख रुपये आहे. मात्र सुनीता यांना चरितार्थासाठी ७ हजार रुपयेच दिले जातात. ही रक्कम वाढवून देण्यासह सुनीतांनी जिल्हा न्यायालयात पतीच्या पे-स्लिपची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली होती. यानंतर त्यांनी सीआयसीकडे अपील केले होते.

बातम्या आणखी आहेत...