आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: या घराच्या मालकाला छतावर जाण्यासाठी घ्यावी लागते पोलिस परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तिसगडच्या रायपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे नारायण यादव किंवा त्यांच्या घरातील कुठलीही व्यक्ती घराच्या छतावर जाऊ शकत नाही. त्यांच्या घरातील कुणालाही छतावर जाण्यापूर्वी पोलिसांची अधिकृत परवानगी घ्यावी लागते. विशेष म्हणजे, ते या घराचे मालक असतानाही त्यांना छतावर जाण्याची परवानगी नाही. कारण, त्यांच्या छतावरून रायपूरचे स्वामी विवेकानंद विमानतळ अगदी बाजूलाच आहे.

 

- त्यांचे घर विमानतळाच्या इतक्या जवळ आहे की ते येणारे आणि जाणारे विमान, धावपट्टी, धावपट्टीवर असलेले सुरक्षा रक्षक पाहू शकतात. एवढेच नव्हे, तर एखादे विमान धावपट्टीवर असल्यास कोणत्या खिडकीवर कोण बसले आहे यांचे चेहरे सुद्धा त्यांना स्पष्टपणे दिसून येतात.
- स्वामी विवेकानंद विमानतळाच्या बाजूलाच असलेले त्यांचे घर फक्त सिंगल फ्लोअर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना छतावर जाण्यास मनाईक केली आहे.
- यासोबतच पोलिस आणि प्रशासनाने त्यांना आपल्या छतावरून किंवा छताच्या जवळपास कुठल्याही प्रकारचे छायाचित्र घेण्यास सक्त मनाई केली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्यांच्या घराच्या परिसराचे आणखी काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...