आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी केला विरोध, मुलीने मंदिरात जाऊन केले लग्न; म्हणाली- पप्पांपासून वाचावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णिया- ग्रॅजुएशन पर्यंत शिक्षण झालेल्या प्रेरणा नावाच्या तरूणीने एक सातवी पास तरूण अमनशी पटना येथे प्रेमविवाह केला. याविषयी कळताच प्रेरणाचे वडिल आणि काका संतापले आणि त्यांनी दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. प्रियकराच्या कुटुंबीयांविरोधात मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे त्रस्त प्रेमी युगूलाने बुधवारी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.


भीतीपोटी कुठेच जाऊ शकत नाही....
प्रेरणाने सांगितले की, माझे अमनवर प्रेम आहे. अमन आणि मी घरातून पळून जाऊन 5 जानेवारीला पटना येथील आर्य मंदिरात लग्न केले. लग्नाला कोणी अवैध म्हणू नये म्हणून नोटरीतून एफिडेविट देखील केले. यानंतर देखील माझ्या वडिलांना विश्वास बसत नाहिये.


प्रेरणाने सांगितले की, माझे वडिल आणि काका आमच्या जिवाचे दुश्मन बनले आहेत. वडिल कुंदन सिहं यांनी माझे पती अमन, सासरे कौशल सिंह, सासू आणि ननंदेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता ते जिवे मारण्याची धमकी देखील देत आहेत.


6 महिन्यांपासून सुरू होते प्रेमसंबंध...
प्रियकर अमनने सांगितले की, तो प्रेरणासोबत आहे. आमच्या दोघांमध्ये सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. अमनचे वडिल आमिर सिहं यांनी सांगितले की, मुलाच्या लग्नानंतर कुटुंबात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. मुलीच्या घरच्यांनी मुद्दाम अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


सदर एसडीपीओ राजकुमार शाह यांनी सांगितले की, हे प्रकरण कौटुंबीक परामर्श केद्राकडे सोपवण्यात आले आहे. जर तरूण आणि तरूणी सज्ञान असतील तर त्यांना आपल्या मर्जीने लग्न करण्याची परवाणगी आहे.


पुढली स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...