आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई अशी असते! पुनीतने अपघातात गमावली आई, दुसरीने वाचवले आता तिसरी पाजतेय दूध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - रविवारी रात्री एका अपघातात 8 महिन्यांच्या चिमुरडल्याने त्याचे कुटुंब गमावसले. अपघातात त्याच्या आई वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला. पण लवकरच त्याला त्याला नव्या आईची कुशी मिळाली. कारण आई शेवटी आई असते. बाळाला रडताना पाहिलं की तिला भरुन येतंच. मद्यधुंद अवस्थेतील एसयूव्ही ड्रायव्हरने बाईकला धडक दिली तेव्हा पुनीत त्याची आई भंवरी देवीच्या कुशीत होता. पडताना त्यांनी मुलाला हवेत फेकले आणि जवळच उभ्या असलेल्या त्याच्या जीव वाचवणाऱ्या आईने म्हणजे लक्ष्मीबेन यांनी त्याला हवेतच झेलले. त्यानंतर आता दूध पाजणाऱ्या आईच्या रुपाने पुनीतला तिसरी आई मिळाली. 


भूकेने व्याकूळ झाला पण बाटलीचे दूध प्यायला नाही 
कुटुंब गमावलेल्या चिमुरड्याला अपघातानंतर पोलिस शेजाऱ्यांकडे सोडून गेले. पुनीत भुकेने व्याकूळ झाला होता. पण बाटलीने तो दूध पित नव्हता. अशा परिस्थितीत रेखा देवी तिसरी आई म्हणून त्याच्या समोर आल्या. पुनीतला त्यांचे दूध पाजून त्या जीवनदान देत आहेत. सोसायटीतील इतर महिलाही त्याचा सांभाळ करत आहेत. पुनीतच्या कुटुंबामध्ये आता केवळ बिकानेरच्या नापासर येथील लहानशा गावात राहणारी आजीच शिल्लक आहे. 


पडण्यापूर्वी आईने बाळाला हवेत फेकले, दुसरीने झेलले 
रविवारी झालेल्या अपघातात पुनीच चमत्कारिकरित्या वाचला. बाईकला धडक दिल्यानंतर पुनीतच्या आईने पडण्यापूर्वी त्याला हवेत फेकले. जवळच उभ्या असलेल्या लक्ष्मीने बाळाला झेलले. त्यामुळे बाळ बचावले. लक्ष्मी याही अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या. 

 

 

बातम्या आणखी आहेत...