आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान;पोलिस चौकीवरील हल्ल्यात सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील हकुरा भागात सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत लष्कराने ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने रविवारी रात्रीपासूनच नाकेबंदी केली. 


मृत अतिरेक्यांत श्रीनगरचा एइसा फाझली, अनंतनागच्या कोकरनागच्या सय्यद ओवेसचा समावेश आहे. तिसऱ्या अतिरेक्याची ओळख पटली नाही. यापैकी एक अतिरेकी अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात एका काॅन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. अतिरेक्यांकडून एके-४७ रायफली, पिस्तुले, हँड ग्रेनेड्स जप्त केले होते.

 

जेलवर छापा 
एनआयएने सोमवारी श्रीनगरच्या सेंट्रल जेलवर छापा मारला. या दरम्यान कैद्यांकडून मोबाइल फोन, सिम, आयपाॅड्स, पाकचा झेंडा आणि जिहादी साहित्य जप्त करण्यात आले. याच तुरुंगातून तोयबाचा अतिरेकी नावीद जट्ट फरार झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...