आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सुरू आहे आमिर-अमिताभ यांच्या \'ठग्ज ऑफ हिंदुस्थान\'ची शूटिंग, पाहा रेअर फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - मेहरानगडमध्ये रविवारी रात्री डायरेक्टर विजयकृष्ण आचार्य यांनी "ठग्ज ऑफ हिंदुस्थन'च्या क्लायमॅक्सची शूटिंग सुरू केली. तत्पूर्वी रात्री उशिरापर्यंत जनाना ड्योढ़ीच्या कोटयार्डमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले स्टंट डायरेक्टर फ्रान्झ स्पिलहाऊस यांनी आमिर खान आणि फातिमा शेख यांच्या फाइटिंग सीनची तालीम घेतली. चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन अशा ठकांची भूमिका साकारत आहेत ज्यांच्या कारनाम्यांमुळे इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आले होते.

रिहर्सलदरम्यान आमिरने क्रू मेंबर्स तसेच काही चाहत्यांसोबत फोटो काढले. लाइन प्रोड्यूसर ज्ञानेंद्रसिंह राठौड़ म्हणाले की, रविवारी दिवसभर सेट डिझायनिंगचे काम चालले आणि क्लायमॅक्सची शूटिंग रविवारी रात्रीपासून रॅम्पार्टवर सुरू होईल. जोधपुरात 25 मार्चपर्यंत शूटिंग शेड़्यूल आहे.

 

स्टंट सीन डायरेक्ट करतील साऊथ आफ्रिकाचे फ्रान्झ
- धमाकेदार स्टंटसाठी ओळखले जाणारे साउथ अफ्रिकाचे फ्रान्झ स्पिलहाउस या चित्रपटाचे स्टंट डायरेक्टर आहेत.
- हॉलीवुड चित्रपट क्रोनिकल, कमांडो आणि ब्लॅक सेइल्समधील आपल्या स्टंट दृश्यांमुळे ते प्रसिद्ध आहेत.
- बॉलीवुडमध्ये त्यांची एंट्री फोर्स-2 मधून झाली होती. त्यांनी कमांडोमध्ये विद्युत जामवालसेाबत काही स्टंट डायरेक्ट केले होते.

 

शेड्यूल संपवून मुंबईला परतला रोनित रॉय
- अॅक्टर रोनित रॉय चित्रपटातील आपले शेड्यूल पूर्ण करून रविवारी दुपारी फ्लाइटने मुंबईला रवाना झाला. एअरपोर्टवर फॅन्सनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतल्या.
- सूत्रांनुसार, मिर्झाच्या गेटअपमध्ये रोनित एक केमियो करत आहेत आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करतील. त्यांचा आमिर खानसोबत कोणताही सीन नाही.

 

रिहर्सलदरम्यान कलाकारांना अशी मिळाली उसंत
- यशराज बॅनरचा चित्रपट "ठग्ज ऑफ हिंदोस्तां'ची शूटिंग मेहरानगडमध्ये सुरू आहे. रविवारी तसा तर ऑफ डे होता, परंतु युनिटसाठी रिहर्सल ठेवण्यात आली होती.
- रिहर्सलदरम्यान जेथे स्टंट टीमने फातिमा आणि आमिर खानसोबत खूप वेळ प्रॅक्टिस केली. नंतर जेव्हा तेव्हा उसंत मिळाली तेव्हा त्यांनी खूप फोटो काढले.
- अमिताभ बच्चन मेहरानगडला पोहोचले नाहीत, परंतु आमिरने युनिट मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसह हसत-हसत फोटो काढले.
- आता येथे दुसऱ्या संस्थानाच्या राजमहालाचा सेट लावला जात आहे. यासाठी मेहरानगडच्या रेम्पार्ट आणि कोर्टयार्डला निळ्या झेंड्यांसोबतच फुलांनी डेकोरेट करण्यात आले आहे.
- याशिवाय राजाच्या फिरण्यासाठी बग्गी आणि वाहनांचीही तयारी आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 210 कोटी रुपये आहे.

फोटो - विकास बोड़ा

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, शूटिंगदरम्यानचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...