आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाचे शिर नसलेले धड मांडीवर घेऊन थोरल्‍याने फोडला हंबरडा, बेरोजगारीला कंटाळून आत्‍महत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- पंजाबमध्‍ये बहुसंख्‍य तरूण नशेच्‍या आहारी गेले आहेत. याचे मुख्‍य कारण आहे बेरोजगारी. याचा प्रचंड विपरीत परिणाम येथील युवकांवर होत आहे. अमृतसरमध्‍ये  नैराश्‍यातून पंजाबमध्‍ये एका युवकाने रेल्‍वेखाली येत आत्‍महत्‍या केली आहे. 24 वर्षांचा हा युवक आर्मी भरती कँपमध्‍ये निवड चाचणीसाठी गेला होता. मात्र त्‍यांची निवड न झाल्‍याने तो प्रचंड निराश झाला. आणि त्रस्‍त होऊन घरी जाण्‍याऐवजी तो सरळ रेल्‍वेरूळाकडे गेला. 

 

आत्‍महत्‍येपुर्वी केला जुळ्या भावाला फोन 
- रेल्‍वेरुळाजवळ पोहोचल्‍यानंतर युवक लवदिपने आपला जुळा भाऊ अजयला फोन केला व म्‍हणाला की, तो कायमचे जग सोडून जात आहे. असे म्‍हणून त्‍याने ताबडतोब फोन कट केला आणि रेल्‍वे रुळावर झोपला. 
- भावाच्‍या फोननंतर मोठा भाऊ अजय आपल्‍या आईला घेऊन ताबडतोब रेल्‍वेरूळावर पोहोचला. मात्र तोपर्यंत भावाचे शिर धडावेगळे झाले होते. भावाचे धड उराशी बाळगत नंतर मोठ्या भावाने हंबरडा फोडला. लवदीपचे वडील जरनल सिंह  रेल्‍वे स्‍टेशनवर रीक्षा चालवतात. त्‍यांना एक छोटा भाऊ आणि बहीणही आहे. 

 

पंजाबमध्‍ये नशेचा 7,500 कोटी रुपयांचा व्‍यवसाय 
- जानेवारी, 2016 मधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थानच्‍या (AIIMS) एका अहवालानूसार, पंजाबमध्‍ये दरवर्षी 7,500 कोटी रुपयांचा नशेचा व्‍यवसाय होतो. 
- भारत-पा‍किस्‍तान बॉर्डरद्वारे तस्‍कर अमली पदार्थ भारतामध्‍ये आणतात. यासाठी त्‍यांना पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआयतर्फे मदत केली जाते. 
- एम्‍सने नुकताच 10 जिल्‍ह्यांचा एक सर्व्‍हे केला होता. या जिल्‍ह्यांची लोकसंख्‍या 2.77 कोटी एवढी आहे. यातील 1.23 कोटी लोक नशेच्‍या आहारी गेल्‍याचे अहवालात नमूद केले आहे. 

 

पंजाबसह मोठी शहरही टारगेटवर 
- सुरक्षा यंत्रणांनी दावा केला आहे की, पाकिस्‍तानमधून येणारे अमली पदार्थ केवळ पंजाबमध्‍येच वितरीत होत नाही. तर देशातील मोठी शहरे  मुंबई, पुणे, जयूपर येथेही त्‍यांचा पुरवठा करण्‍यात येत आहे. 
- मीडिया रीपोर्ट्सनूसार रोज जवळपास 20 कोटी रुपये ड्रग्‍सवर खर्च केले जातात. 

 


पंजाबमधील ड्रग्‍सशी संबंधित आणखी काही फॅक्‍ट्स 
- जवळपास 90 टक्‍के शिक्षीत युवक पंजाबमध्ये नशेच्‍या आहारी गेले आहेत. पंजाबमध्‍ये नशेवर रोज एक व्‍यक्‍ती सरासरी 1400 रुपये खर्च करतो. 
- पंजाबमध्‍ये सर्वाधिक विक्री हिरोईनची होते. एकुण नशेत याचे प्रमाण 53 टक्‍के आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...   

 

बातम्या आणखी आहेत...