आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखर्जी यांच्या हस्ते शाळा, शिक्षकांना ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन अवॉर्ड््स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी देशातील सर्वोत्कृष्ट शाळा, शैक्षणिक संस्था, शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थ्यांना नुकतेच गौरवण्यात आले. लव्हली व्यावसायिक विद्यापीठाच्या वतीने (एलपीयू) सामाजिक उद्योग जबाबदारी कार्य(सीएसआर) अंतर्गत  ५ सप्टेंबर २०१७ रोजी शिक्षकदिनी ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन अवॉर्ड््सची घोषणा झाली होती. एलपीयूच्या विनंतीवरून मुखर्जी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.  


पुरस्कार सोहळ्यात मुखर्जी यांच्या हस्ते शाळा व शैक्षणिक संस्थांना अध्यापनासाठी निधीच्या रूपात तसेच शिक्षण, प्रशिक्षक, विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांचे रोख पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लव्हली समूहाचे अध्यक्ष रमेश मित्तल, एलपीयूचे कुलगुरू अशोक मित्तल, उपकुलगुरू रश्मी मित्तल यांचीही उपस्थिती होती.  


समारंभात प्रणव मुखर्जी म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात अशा प्रयत्नांमुळे गुणवत्तेत वाढ होईल. एलपीयूचे कुलगुरू मित्तल यांनीही विचार मांडले. ते म्हणाले, ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन अवॉर्ड््ससाठी झालेल्या पाहणीत देेशभरातील शैक्षणिक संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या अंतर्गत ३ हजार ४ ९५  नामांकन मिळाले .६ लाखांहून अधिक मते तर ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले. त्याआधारे ११५ व्हिडिआे (८६ शाळा तर २९ इतर शैक्षणिक संस्था) निवडण्यात आले. विजेत्या १३ शाळांना प्रत्येकी एक-एक लाखांचा निधी प्रदान करण्यात आला. निवड झालेल्या संस्थांचे शिक्षक-विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५ हजार व १० हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान केले.  शैक्षणिक संस्थेच्या विभागात २९ व्हिडिआेच्या संस्थांना २५ हजार रुपये प्रति प्रशिक्षण निधीची भेट देण्यात आली. त्याशिवाय नामांकन मिळालेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांना अनुक्रमे १० हजार रुपये व २ हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...