आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सी ड्रायवरने रात्री तरूणीला चुकीच्या रस्त्याने नेले, गाडी थांबवून केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- उबर टॅक्सी ड्रायव्हरने एका तरूणीसोबत छेडछाड आणि शिवीगाळ केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आळे आहे. एवढ्या सर्व घटना घडल्यानंतर देखील उबर टॅक्सीचे चालकांनी आपल्या हरकती थांबवल्या नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. नुकतेच एका तरूणीने माध्यामांसमोर येऊन एका उबर टॅक्सी ड्रायव्हरने छेडछाड करून गाडीतून सामान बाहेर फेकले आणि शिविगाळ केल्याचा खुलासा केला आहे. 


दिव्य मराठीला सांगितली आपली व्यथा...
शहरातील 26 वर्षीय सेलिब्रिटी मॅनेजर अवनी सोनीने दिव्य मराठीशी बोलताना आपली व्यथा शेअर केली, तिने सांगिलते की, मला अहमदाबाद येथून मुंबईला जायचे होते. त्यामुळे रात्री 11 वाजता माझी फ्लाइट होती, मी वारणा येथे राहते, सेलिब्रिटी मॅनेजर असल्यामुळे नेहमी ट्रॅव्हलिग करावे लागते.  मला कधीही ये-जा करावी लागते. परंतु, यावेळचा माझा अनुभव खुप वाइट होता. माझ्या या अनुभवावरूनच मी सांगेल की, तरूणींनी कधीच उबर टॅक्सीचा वापर करू नये.


रात्री 10 वाजता कॅब आली...
माझ्या घरापासून विमानतळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यासाठी मा कॅब बोलवली. मी ड्रायव्हर इंद्रजीतला वासणाते विमानतळ नेण्यास सांगितले. त्याचबरोबर मी सांगितले की, मी ज्या रस्त्याने सांगेल त्या रस्त्याने घेऊन चल. परंतु, ड्रायव्हरने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने चुकीचा रस्ता पकडला. मी त्याला हटकले तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे नेव्हिगेशन आहे. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने कॅब हळू चालवण्यास सुरूवात केली. मी फ्लाइट मीस होइल म्हणून गाडी वेगात चालवण्यास सांगितले तेव्हा, त्याने खुप वेगाने गाडी पळवण्यास सुरूवात केली. 


जोरात ब्रेक मारले, तेव्हा मला भीती वाटली...
अवनीने सांगितले की, कॅबचा वेग ट्राफिक असणाऱ्या एरियात अतिशय जास्त होता. मी ड्रायव्हरला हळू चालवण्यास सांगितले, पण त्याने ऐकले नाही. कॅब टाऊन हॉलजवळ पोहोचली, तेव्हा त्याने सरळ गाडी घेण्याऐवजी चुकीच्या रस्त्याने लेफ्टला वळवली. यामुळे मला भीती वाटायला लागली. त्यानंतर त्याने कॅब सन्यास आश्रमाजवळ एका गल्लीत नेली. मी त्याला हटकले तेव्हा त्याने जोरात ब्रेक मारले. यामुले मी पुर्णपणे भीले होते.


सामान गाडीतून फेकून केली शिवीगाळ...
त्याने कॅब थांबवून माझ्ये सामान गाडीतून खाली फेकून दिले आणि मला शिवीगाळ केली. मी त्याला म्हणाले तु हे चुकीचे करत आहेस, तेव्हा तो म्हणाला तुला जे करायचे ते कर. यानंतर मी माझ्ये सामान घेऊन तेथून पायी चालू लागले. तेव्हा त्याने माझा पाठलाग कऱण्यास सुरूवात केली. मी जोरत पळू लगाले, तेवढ्यात माझा फोन पडला. भीतीने माझा थरकाप होत होता. त्यानंतर एका ऑटोवाल्याच्या मदतनीने विमानतळ गाठले.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...