आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंक केले नाही म्हणून यूआयडीएआय संचालकांचेच सिम बंद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- आधार लिंक केले नाही म्हणून आधार कार्ड तयार करणाऱ्या यूआयडीएआयच्या प्रकल्प संचालकांचे सिम कार्ड बंद झाले. आधारचे प्रकल्प संचालक एच. एल. प्रभाकर कर्नाटकात ई-गव्हर्नन्ससाठी केंद्र सरकारचे अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. 


पाच दिवसांपूर्वी त्यांचे सिम कार्ड बंद झाले तेव्हा त्यांनी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपनीला फोन केला. तेव्हा त्यांनी आधार लिंक नसल्याचे कारण दिले. आपण ओटीपीने आधार लिंक केले असल्याचे प्रभाकर यांनी सांगितले तेव्हा कंपनीने बोटांचे ठसे मागितले. 
प्रभाकर म्हणाले, लोकांना आधार कार्ड देणाऱ्या विभागाचा प्रमुख म्हणून मी काम करतो आणि फोन सेवा पुरवणारी कंपनी मलाच वेड्यात काढते आहे.

बातम्या आणखी आहेत...