आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्डधारकांच्या सुरक्षेसाठी आता व्हर्च्युअल आयडी;16 अंकांचा तात्पुरता क्रमांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधार डेटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने UIDAI ने नवील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. - Divya Marathi
आधार डेटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने UIDAI ने नवील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली- आधार कार्डच्या डेटाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) द्विस्तरीय सुरक्षा पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आभासी ओळख व मर्यादित केवायसीच्या माध्यमातून वैयक्तिक गोपनीयता राखली जाईल. हा व्हर्च्युअल आयडी पर्यायी असेल. एखाद्या युजरला व्हेरिफिकेशनसाठी १२ अंकी क्रमांक देण्याची इच्छा नसेल तर तो १६ अंकी व्हर्च्युअल आयडी देऊ शकेल. यामुळे सिम व इतर सुविधांसाठी आधार क्रमांक देण्याची गरज नसेल. दुसरीकडे, मर्यादित केवायसी सुविधा ही आधारधारक नव्हे तर सरकारी संस्थांसाठी आहे. काही दिवसांपूर्वी आधारच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. 


> १ मार्चपासून सुरू होईल सुविधा, सर्व कंपन्यांना १ जूनपासून ती स्वीकारणे सक्तीचे

 

व्हर्च्युअल आयडी: आधारधारक केव्हाही जनरेट करू शकतील, संस्थांच्या डुप्लिकसीलाही आळा

> व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? : हा एक १६ अंकी तात्पुरता क्रमांक आहे. आधारऐवजी तो वापरला जाईल. व्हेरिफिकेशनसाठी केवायसीच्या वेळी आधारऐवजी  युआयडीएआय वेबसाइटवरून तो तत्काळ जनरेट करता येईल. 
> एका वेळी एकदाच व्हॅलिड... ठराविक वेळ मर्यादेनंतर हा क्रमांक पुन्हा जनरेट करता येईल. एका वेळी एकच व्हर्च्युअल आयडी व्हॅिलड असेल. नवा जनरेट झाल्यावर जुना आपोआप रद्द होईल.
> डुप्लिकेटला आळा... डुप्लिकसी करू शकणार नाहीत. अॅथॉन्टिकेशनच्या वेळेस बोटांच्या ठशांसोबत हा व्हर्च्युअल आयडी द्यावा लागेल. ही सुविधा यंदा १ मार्चपासून सुरू होईल. कंपन्यांना ती १ जूनपासून स्वीकार करणे सक्तीचे असेल.


नव्या व्यवस्थेचा परिणाम - आधारकार्डचा उपयोग करणाऱ्याची मर्यादित माहितीच घेतली जाईल सेवा पुरवठादार संस्था मर्यादित केवायसीनुसार यूजरची मोजकी माहितीच घेऊ शकतील. सध्या या संस्था आधार घेतात आणि तो क्रमांक स्टोअर करून ठेवतात. मर्यादित केवायसीमुळे संस्था आधार क्रमांक स्टोअर करू शकणार नाहीत. या संस्था टोकनच्या माध्यमातून यूजर्सची ओळख पटवतील. व्हर्च्यूअल आयडीने केवायसी केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...