आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा; 5 जूनपर्यंत अटक नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअरसेल - मॅक्सिस प्रकरणात विशेष न्यायालयाकडून ५ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर काही तासांतच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. चिदंबरम यांच्यातर्फे अॅड. पी. के. दुबे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या कक्षात हा अर्ज दाखल केला. न्यायालय या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करणार आहे. 

 

तत्पूर्वी, चिदंबरम यांनी एअरसेल मॅक्सिस मनी लाँडरिंग प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यासमोर अर्ज दाखल केला. या प्रकरणात ईडीने चिदंबरम यांना ५ जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावले अाहेत. चिदंबरम यांनी त्यानुसार ५ जूनला ईडीसमोर हजर राहावे, असे निर्देश सैनी यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...