आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नाव अत्याचार: हायकोर्टाने योगी सरकारकडून मागवला अहवाल, प्रकरण सुप्रीम कोर्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडीजी राजीव कृष्ण बुधवारी पीडितेच्या माखी गावात पोहोचले. ते म्हणाले की, आम्ही येथे चौकशीसाठी आलो आहोत. संध्याकाळपर्यंत सरकारला अंतिम अहवाल सोपवू. - Divya Marathi
एडीजी राजीव कृष्ण बुधवारी पीडितेच्या माखी गावात पोहोचले. ते म्हणाले की, आम्ही येथे चौकशीसाठी आलो आहोत. संध्याकाळपर्यंत सरकारला अंतिम अहवाल सोपवू.

अलाहाबाद/लखनऊ - उन्नाव सामूहिक अत्याचार प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत सरकारकडून अहवाल मागवला आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. के. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पीडितेच्या पत्राचीही दखल घेतली आहे. गुरुवारी सुनावणीच्या वेळी वैयक्तिकरीत्या हजर राहावे, तसेच पीडितेच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नसतील तर मृतदेह सुरक्षित ठेवावा, असे निर्देश कोर्टाने सरकारच्या अॅडव्होकेट जनरल यांना दिले आहेत.

 

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने याची सीबीआय चौकशी आणि भरपाईची मागणी करणारी याचिका स्वीकारली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधी एसआयटी चौकशीचा आदेश दिला, नंतर पोलिसांकडून सायंकाळपर्यंत अहवालही मागवला. बुधवारी पोलिस पथकाने पीडितेच्या गावात जाऊन चौकशी केली.

 

काय आहे पूर्ण प्रकरण?  
प्रकरण गेल्या वर्षाच्या चार जूनचे आहे. १७ वर्षीय मुलीच्या आईने आमदार कुलदीपसिंह सेंगरसह काही लोकांविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. ३ एप्रिलला आमदाराचा भाऊ अतुलने खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकला. ८ एप्रिलला पीडितेने कुटुंबासह मुख्यमंत्री निवासाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ९ एप्रिलला पीडितेच्या वडिलांचा उन्नाव तुरुंगात मृत्यू झाला.  

 

बचाव आमदाराच्या पत्नीने केली नार्को टेस्टची मागणी  
अत्याचारप्रकरणी आरोपी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांची पत्नी संगीता बुधवारी डीजीपींकडे गेल्या. त्या म्हणाल्या-मी येथे पतीसाठी न्यायाची मागणी करण्यास आले आहे. माझे पती आणि पीडितेची नार्को चाचणी करा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुली खूप त्रस्त आहेत. आतापर्यंत कुठलाही पुरावा सादर झाला नाही, पण त्यांना बलात्कारी म्हटले जात आहे. 

 

आरोप पीडिता म्हणाली : डीएमने हॉटेलमध्ये बंद केले  
अत्याचार पीडितेने म्हटले की, मी सीएम योगींकडे न्यायाची मागणी करत आहे. डीएमनी मला एका हॉटेलच्या खोलीत बंद केले होते, पाणीही दिले नाही. दोषींना शिक्षा व्हावी, त्यांना फाशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांनी माझ्या वडिलांना मारले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी पीडितेला भेटण्यास उन्नावमधील तिच्या माखा या गावी जातील. 

 

व्हिडिओत आमदाराच्या भावाची मारहाण, पोलिस गप्पच  
पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते हल्ल्याबाबत बोलत आहेत. ते म्हणत आहेत की, आमदाराचा भाऊ अतुल मला मारत होता. कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिस नुसते उभे होते. मंगळवारीही व्हिडिओ समोर आला होता, त्यात पीडितेच्या पित्याच्या अंगठ्याचे निशाण घेतले जात होते. एक ऑडिओही व्हायरल होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...