आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या भारतीय दुतावासातील अधिकाऱ्याचा आचारी अटकेत, ISI ला पुरवत होता माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी रमेश कन्यालचा भाऊदेखिल सैन्यात तैनात आहे. - फाइल - Divya Marathi
आरोपी रमेश कन्यालचा भाऊदेखिल सैन्यात तैनात आहे. - फाइल

लखनऊ - पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला माहिती देण्याच्या आरोपात पोलिसांनी बुधवारी उत्तराखंडच्या पिथौरागडच्या डीडीहॉट परिसरात एका व्यक्तीला अटक केली. रमेश सिंह कन्याल असे त्यांचे नाव आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश एटीएस आणि उत्तराखंड पोलिसांनी केली. पाकिस्तानात ब्रिगेडियरच्या घरी काम करताना त्यांची माहिती लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. युपी एटीएस ठाण्यात त्यांच्या विरोधात 20 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 


कोण आहे रमेश कन्याल?
- युपी एटीएसचे आयजी असीम अरुण यांनी सांगितले की, रमेश सिंह कन्याल यांचा भाऊ आर्मीत तैनात आहे. त्याच्यात शिफारसीवरून रमेशला एका ब्रिगेडियरच्या घरात जेवण तयार करण्याचे काम मिळाले होते. काही वेळाने या ब्रिगेडियरची नियुक्ती पाकिस्तानातील भारतीय दुतावासात झाली. 
- रमेश जेवण चांगले बनवत होता. त्यामुळे ब्रिगेडियर त्याला पाकिस्तानात त्यांच्या सोबत घेऊन गेले. त्याचठिकाणी तो पाकच्या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आला होता. 


आरोप काय?
रमेश ब्रिगेडियरबाबत गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती देत होता. त्याशिवाय गेल्यावर्षी भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या संयुक्त सैन्य अभ्यासाची माहितीही त्याने ISI एजंटला दिली होती. 

 

काश्मिरमार्गे पाक सीमेपर्यंत गेला 
युपी एटीएसचे आयजी असीम अरुण यांनी सांगितले की, रमेश अनेकदा पंजाब आणि काश्मीर मार्गे पाक सीमेपर्यंत गेला आहे. एटीएस त्याच्याबाबत सध्या आणखी माहिती मिळवत आहे. रमेशकडे मिळालेला लॅपटॉर आणि फाइल एटीएसने ताब्यात घेतल्या आहेत. लॅपटॉपमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी आढळल्या आहेत. 


एकाच क्रमांकाशी अनेकदा संपर्क 
एटीएसमधील सुत्रांनी सांगितले की, रमेशच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्समध्ये एक क्रमांक असा आहे, ज्यावर अनेकदा बोलणे झालेले आहे. या मोबाईलमध्ये त्याने तीन सिम लावले होते हेही समोर आले आहे. पण तो मोबाईलचा वापर अत्यंत कमी करत होता. सायबर कॅफेमध्ये तो अनेकदा जात होता. पोलिस स्थानिकांकडून त्याच्याबाबत माहिती मिळवत आहेत. 


ओळख लपवून राहत होता 
बुधवारी एटीएसच्या 5 जणांच्या टीमने आरोपीला रिमांडवर घेतले. जेव्हा ही कारवाई करण्यात आली, तेव्हा तो पिथौरागड जिल्ह्यात गराळी खोली, जौलजीवी, डीडी हाट याठिकाणी ओळख लपवून राहत होता. तो याठिकाणी एक दुकान चालवत होता. तो अडिच वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आला होता. त्याच्याकडून एटीएसने पाकिस्तानी ब्रँडचा मोबाईलही जप्त केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...