आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड : डंपरने भाविकांना चिरडले; 11 ठार, 15 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिथोरागढ/बरेली - उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात टनकपूर भागात पूर्णागिरी मंदिराकडे पायी जाणाऱ्या भाविकांना शुक्रवारी पहाटे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चिरडले. या अपघातात ११ जण ठार झाले, तर १५ जण जखमी झाले. ठार झालेले भाविक उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील आहेत.

 

बरेली येथून २५० भाविकांचा एक गट देवीच्या पालखीसह जात होता. पहाटे पाच वाजता सितारगंज येथून टनकपूरकडे येणाऱ्या डंपरने विक्री कर कार्यालयाजवळ पायी जाणाऱ्या या भाविकांना चिरडले. नऊ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींपैकी दोन जणांचा नंतर मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना टनकपूर येथून खटिमा आणि पिलीभीत (उत्तर प्रदेश) येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी आणि इतर लोकांना परत पाठवण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली. पालखीसोबत असलेल्या इतर लोकांनी मृतांच्या आणि जखमी लोकांच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.

 

 

बातम्या आणखी आहेत...