आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षे लहान विद्यार्थिनीवर जडला होता शिक्षकाचा जीव, अशी होती Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. कॉलेज तरुण तरुणींमध्ये याची मोठी क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. अशा वेळी बिहारमधील गुरु-शिष्याची प्रेमकथेची चर्चा होणे अटळ आहे. बिहारमधील प्रोफेसर आणि त्यांची विद्यार्थिनी यांची प्रेमकथा एकेकाळी राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेचा विषय होती. मटुकनाथ आणि ज्युली ही नावे तुम्हाला नक्कीच आठवणीत असतील. प्रोफेसर मटुकनाथ आणि त्यांची विद्यार्थिनी जुली यांच्या वयात 30 वर्षांचे अंतर होते. दोघांनीही प्रेमासाठी मोठ्या संघर्षाचा सामना केला. पण कठीण परिस्थितीतही एकमेकांना चांगली साथ दिली. दोघांनी अजून लग्न केलेले नसले तरी ते लिव्ह इनमध्ये राहतात. प्रेमाला वयाचे बंधन नसते, हे त्यांनी दाखवून दिले.

 

अशी सुरू झाली लव्ह स्टोरी...
या दोघांची पहिली ओळख वर्गामध्ये झाली होती. 2004 मध्ये मटुकनाथ यांनी एका कॅम्पचे आयोजन केले होते. ज्युलीही त्यात आली होती. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांच्या तासनतास फोनवर गप्पा व्हायच्या.


ज्युलीने केले होते प्रपोज 
- प्रोफेसर मटुकनाथ यांना ज्युलीनेच प्रपोज केले होते. मटुकनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस ज्युलीचा फोन आला आणि तिने त्यांना थेट प्रपोज केले. ज्युलीने मटुकनाथ यांना, तुम्ही मला आवडता असे स्पष्टपणे सांगितले होते.
- ज्युलीने तिच्या भावना व्यक्त केल्यानंतर मटुकनाथ यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. माझे आधीच लग्न झालेले आहे, मला मुलेही आहेत त्यामुळे हे शक्य नाही, असे त्यांनी ज्युलीला समजावले होते. पण सुरुवातीला नकार दिल्यानंतर तेही हळू हळू जुलीवर प्रेम करू लागले. 

 

2006 मध्ये आल्या होत्या अडचणी 
- ज्युलीबरोबरच्या प्रेमामुळे 15 जुलै 2006 रोजी पाटणा युनिव्हर्सिटीने मटुकनाथला बीएन कॉलेजच्या हिंदी डिपार्टमेंटच्या रीडर पदावरून निलंबित केले होते. त्यानंतर 20 जुलै 2009 रोजी त्यांची कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात आली. एवढेच नाही तर, देशभरात त्यांच्यावर चर्चा सुरू झाली. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप लागले. सगळे जगच जणू त्यांच्या विरोधात उभे राहिले. मटुकनाथ यांना त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण केली, समाजातील लोक टोमणे मारत होते. 

 

पत्नीने पोहोचवले तुरुंगात... 
मटुकनाथ यांच्या पत्नीला जेव्हा त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मटुकनाथ आणि ज्युली दोघांच्या विरोधात तक्रार करत त्यांना तुरुंगात पोहोचवले. अनेक दिवस माध्यमांमध्ये या बातमीची चर्चा झाली. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोघे सामन्यपणे जीवन जगू लागले. सध्या दोघे लिव्ह इनमध्ये राहतात. 

 

व्हॅलेंटाईन डेला ज्युलीला गिफ्ट केली होती कार 
मटुकनाथ अनेक वर्षं नोकरीतून निलंबित राहिले. पण 2013 मध्ये 13 फेब्रुवारी रोजी पाटणा युनिव्हर्सिटीने मटुकनाथ यांना पाच वर्षांचा एरियर्स म्हणून 20 लाख रुपये दिले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला एक कार खरेदी करून ज्युलीला गिफ्ट केली होती. 4 लाखांचा कर वगळता मटुकनाथ यांना 16 लाख रुपये मिळाले होते. पण मटुकनाथ यांचे गिफ्ट पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्युली आणि मटुकनाथ यांची स्टोरी आणि फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...