आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसर- महापालिकेत उपमहापौर युनूसकुमार सोमवारी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी होती. पदभार स्वीकारल्यानंतर ते जसे कार्यालयातून बाहेर पडले तेव्हापासून कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर नोटांची उधळण सुरू केली. या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे गुंडाळून ठेवत स्टेपलरने पिना मारलेल्या २०, ५० व २०० रुपयांच्या नोटांचे हार युनूसकुमार यांच्या गळ्यात घातले.
आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे
बँकेच्या मागदर्शक तत्वानुसार, नव्या अथवा जुन्या नोटांना स्टेपल करता येत नाही तसेच त्यांची उधळणही करता येणार नाही. नोटा खराब झाल्या म्हणून बँका त्या स्वीकारणार नाहीत.
- सतीश वर्मा, सेंटर फॉर रिसर्च रुरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, आरबीआय
युनूस म्हणाले : आनंदाच्या भरात नाेटांची उधळण
उपमहापौर युनूसकुमार म्हणाले, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी महापालिकेत वाल्मीकी समाजास प्रतिनिधित्व दिले आहे. यामुळे समर्थकांत या आनंदात कोणी नोटांची उधळण केली.
समर्थकांनी स्वत: उचलला कचरा
पदग्रहण सोहळ्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. समर्थकांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तळमजल्यावर पसरलेला कचरा स्वत: गोळा केला. स्वच्छता माेहिमेनुसार शहर स्वच्छ ठेवणे अापल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे युनूसकुमार म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहा, नोटा गोळा करण्यात वेस्त लोक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.