आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच केली तीन वर्षाच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण, लाथा बुक्क्यांनी तुडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद (हरियाणा)- एका माहिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिला घराच्या छतावर लहानग्याला अतिशय निर्दयीपणे मारहान करताना दिसत आहे. मारहाणीत चिमुकला जमीनिवर तोंडावर पडतो. तरि देखील महिला चिमुकल्याला चापटा, बुक्क्या आणि चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. 

 

आधी मुलगा दत्तक घेतला, आता करत आहे मारहाण...
- मिळालेल्या माहितीनुसार, चाइल्ड प्रोटेक्सन ऑफिसर सुरजीत बाजिया यांनी सांगितले की, त्यांना गुप्तपणे माहिती मिळाली होती की, धर्मशाळा रोडवर एक महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला अतिशय निर्दयीपणे मारहाण करत आहे.
- महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओ चाइल्ड प्रोटेस्शन ऑफिसरला पाठवण्यात आला. व्हिडिओ आणि प्रकरणाची माहिती मिळाताच टीम घटनास्थळी पोहोचली.
- येथे मुलाला मारहान करणारी महिला रेणु जैन हिला टीमने मुलासह आपल्या ऑफिसमध्ये आणले. टीमने तिची विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले की, हा मुलगा तिचा नाही.
- पंजाबमधून बठिंडा येथून तिने त्याला दत्तक घेतले होते. दत्तक घेतल्याचे कागदपत्र मागितले तेव्हा महिला ते देखील दाखवू शकली नाही.
- मारहाणीमुळे मुलगा अतिशय घाबरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीचे निशान होते. अधिक चौकसी केली तेव्हा कळाले की, मुलाला टीबीचा आजार आहे.
- या प्रकरणानंतर मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलिस रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी कार्यावही करत होते.


कामगाराने बनवला होता व्हिडिओ....
- लोकांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ एका कामगाराने बनवला होता, तो शेजारील एका इमारतीत बांधकामाचे काम करत होता. तो गेल्या 10 दिवसांपासून महिलेला मुलाला मारहणा करताना पाहत होता.
- यानंतर गुरूवारी त्याने या घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच या प्रकरणाची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीला दिली.


पुढील स्लाइडवर फोटोंमधून पाहा अशी केली मारहाण...

बातम्या आणखी आहेत...