आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP आमदाराच्या 'Ex GF' चा राडा: म्हणाली, मीच पत्नी! प्रेम केलंय सोडणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - कर्नाटकात एका भाजप आमदाराच्या कथित माजी प्रेयसीने त्याच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा केला. महिलेने आपण या आमदाराची पत्नी असल्याचा दावा केला आहे. कार्यालय परिसरात आमदाराची भेट झाली नाही, तेव्हा या महिलेने आपण त्याला सोडणार नाही अशी धमकी दिली. 2014 मध्ये आमदार झालेले एसए रामदास आणि महिला प्रेमकुमारी आपल्या अफेअरमुळे चर्चेत होते. रामदास यांनी म्हैसूरच्या कृष्णराजा येथून निवडणूक जिंकली होती. 


- स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार, एका महिलेने सकाळी-सकाळी भाजप आमदार रामदास यांच्या कार्यालयाबाहेर राडा सुरू केला. याच ठिकाणी आमदाराचे घर सुद्धा आहे. तिने आपले नाव प्रेमकुमारी असल्याचे माध्यमांना सांगितले. 
- सोबतच, ज्या आमदाराच्या घराबाहेर ती राडा घालते आहे, तो प्रत्यक्षात आपला पती आहे असा दावाही तिने केला. यानंतर कार्यालयातील काही कर्मचारी आले आणि त्यांनी आमदार नसल्याचे त्या महिलेला सांगितले. तेव्हा महिला आणखी भडकली आणि जोर-जोरात ओरडून धमक्या देण्यास सुरुवात केली.
- महिला म्हणाली, मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत रामदास यांना सोडणार नाही. मी एका चांगल्या कुटुंबातून आले आहे. माझे रामदास यांच्यावर प्रेम आहे. प्रेमाखातर मी निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण, निवडणुकीनंतर मी त्याची भेट घेण्याचा खूप प्रयत्न केला. कित्येक फोन लावले. पण, तो माझा फोन देखील उचलण्यास तयार नाही. मी त्याला सोडणार नाही."


कर्मचाऱ्यांवरही लावले आरोप
दुसरीकडे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर सुद्धा तिने आपल्यासोबत गैरवर्तनाचे आरोप लावले आहेत. ते कर्मचारी आपल्या विरोधात अभद्र भाषेचा वापर करत होते असेही ती महिला म्हणाली. काहींच्या मते, ही महिला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी खोटे आरोप लावत आहे. सोबतच ती आपण पत्नी असल्याचा फक्त दावा करत आहे. तिच्याकडे यासंदर्भातील कुठलेही पुरावे नाहीत. 


निवडणुकीच्या वेळी होते चर्चेत
प्रेमकुमारी आणि आमदार रामदास यांच्यातील प्रेम प्रकरणाच्या निवडणूकीच्या पूर्वीपासून चर्चा होत्या. त्यावेळी प्रेमकुमारीने रामदस यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची धमकी दिली होती. यानंतर काही कारणास्तव तिने उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. तेव्हा सुद्धा या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.

 

पुढील स्लाइड्सवर आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...