आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या मजल्यावरून महिलेने घेतली उडी, पतीने अंतर ठेवल्यामुळे उचलले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- पालसिया परिसरात शुक्रवारी एका रेसिडेंशीअल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या कऱण्याचा प्रयत्न केला. सदर महिला गेल्या दोन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. तिचा पती हाँगकाँगमध्ये काम करतो. लग्नाच्या काही दिवसानंतर ती आजारी पडली होती, तेव्हापासून तिच्या पतीने तिला घटस्फोटाच्या नोटीस पाठवली होती. नंतर तीला घेण्यासाठी देखील आला नाही. यामुळेच ती अतीशय तनावात होती. पलासिया पोलिसांनी मर्ग कायम करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


- पलासिया टीआय धैर्यशील येवले यांनी सांगितले की, मृत प्रीती अजय परदेशी (30) वृंदावन येथील रहिवाशी आहे. प्रीती शुक्रवारी दुपारी गीता नगर येथील आपल्या काकाकडे  रेंबो अपार्टमेंटमध्ये आली होती. येते अचानक डिप्रेशनमध्ये येऊन तिने आपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी घेतली. डोक्याच्या दिशेने खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या अचानक पडण्याने आपार्टमेंटमधील लोक, दुकानदार आणि रस्त्याने जाणारे लोक घाबरले. या घटनेची माहिती तात्काळ नातेवाईकांना देण्यात आली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...