आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाजा उघडताच 25-26 वर्षाचे तीन तरूण अंगावर आले, असे होते ते भीतीदायक क्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- उज्जेन येथील शास्त्रीनगरमध्ये भरदिवसा तीन टवाळखोर एलाआय़सी एजंटच्या घरात घुसले, एकाने महिलेचा गळा आणि तोंड दाबला आणि कानातील दागिने आणि मंगळसुत्र काढून घेतले. त्याचा दुसरा सहकारी पतीला चाकूचा धाक दाखवून मागच्या खोलीत आलमारीजवळ घेऊन गेला आणि त्यातून एक लाख रूपये कीमतीचे दागीने आणि घरात ठेवलेले दोन मोबाईल फोन बॅगेत भरून घेतले आणि घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून फरार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.


घटनेनंतर पीडित दांम्पत्य आतून बंद असलेल्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर आले आणि आरडाओरड सुरू केली. नगरसेवक विजयसिंह दरबार यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जवळपास दोन तास फिगरप्रिन्टसचे पुरावे गोळा केले आणि दाम्पत्याची चौकशी केली. शेजारील काही महिलांनी सांगितले की, त्यानी तीन तरूणांना पळतांना पाहिले. त्यांच्या हातात चाकू होते आणि एकाच्या पाठीवर बॅग लटकवलेली होती. दुर अंतरावर पळत गेल्यानंतर ते एका बाईकवर बसून फरारा झाले. एएसपी नीरज पांडे यांनी सांगितले की चोरट्यांनी पुर्ण कॉलनीत या एकाच घराला टार्गेट का केले याची चौकशी करण्यात येत आहे. किरायाने राहणाऱ्या तरूणांची देखील चौकशी करण्यात येत आहे.


पत्नीने सांगितले की, दरवाजा उघडताच ते अंगावर आले...
दरवाजावर आलेल्या 25-26 वर्षाच्या तीन तरूणांनी पतीला विचारले शर्माजी तुम्हीच आहात का? ते हो म्हणाले आणि एवढेच ऐकताच ते तिघे घरात घुसले. नंतर माझ्या अंगावर धावून आले आणि माज्या कानातील आणि गळ्यातील मंगळसुत्र काढून घेतले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...