आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime : चांगला नवरा मिळावा म्हणून बळी देण्यासाठी घटस्फोटीतेकडून मुलाचे अपहरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - घटस्फोटीत महिलेला चांगला नवरा मिळावा म्हणून बळी द्यायचा होता. त्यासाठी महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याच्या मित्राच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. या मुलाचा बळी देण्याची तयारी सुरू होती. पण पोलिसांनी वेळीत प्रियकरासह महिलेला अटक केली. महिलेने मुलाला जवळ राहणार्या गावातील बहिणीजवळ लपवले होते. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन कुटुंबीयांना सुपूर्त केले आहे. 


CCTV फुटेजची मदत 
अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांचे नाव मानक चौधरी. त्याचा मित्र चंदन त्याला भेटण्यासाठी आला होता. त्याच्याबरोबर एक महिलाही होती. तो त्यावेळी कामाला गेलेला होता. घरी फक्त पत्नी आणि वयस्कर वडील होते. चंदनने त्याच्या पत्नीला काहीतरी कामासाठी बाहेर पाठवले आणि वडिलांनाही पाणी आणण्याच्या निमित्ताने घरात पाठवले. वयस्कर असल्याने त्यांना पाणी आणण्यास उशीर झाला. ते बाहेर आले तोपर्यंत त्यांचा मुलगा शिवम बेपत्ता झाला होता. ते परत जाताना मुलाच्या आईने पाहिले होते. घरात मुलगा नसल्याचे कळताच पत्नीने पतीला कळवले. जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्येही ते बाळ नेत असल्याचे दिसले. 

 

अशी झाली होती चंदन आणि परविंदरची भेट 
परविंदरचे लग्न अमृतसरमध्ये झाले होते. वर्षभरात तिचा घटस्फोट झाला. आई वडिलांनीही तिला थारा दिला नाही. नंतर परविंदर चंदिगडमध्ये एका हॉटेलमध्ये काम करू लागली. तर चंदन कुटुंबाबरोबर गावात राहत होता. चंदनचे वडील वादामुळे उत्तर प्रदेशात गेले. त्यानंतर तो आई आणि बहिणीसह ग्यासपुरामध्ये राहू लागला. त्यावेळी त्याची आई परविंदर काम करत असलेल्या हॉटेलमध्येच कामाला लागली. त्यांच्याच ओळख झाल्यानंतर परविंदर आणि चंदन यांचीही ओळख झाली आणि दोघांत संबंध निर्माण झाले. 


ढाब्यावर महिलेला पाहून पोलिसांना आला संशय 
पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्यानंतर सगळीकडे अलर्ट दिला होता. सोमवारी सकाळी पोलिसांना एका ढाब्यावर एक महिला संशयित अवस्थेत आढळल्याचे समजले. आधी तिच्याकडे मुल होते हेही समजले. दुसरीकडे मुलाचे वडील मानक हेही मुलाचा शोध घेत होते. त्यांनाही चंदन खरडमध्ये असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी धाड टाकत आरोपींना अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...