आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime : भावाच्या हत्येसाठी तिने चिकन करीत घातले विष, घेतला चार जणांचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिनाडू - शिवकासी शहरामध्ये एका महिलेने चिकन करीमध्ये विष मिसळून तिच्या भावासह एकूण चार जणांची हत्या केली. पोलिसांनी याबाबदत माहिती देताना सांगितले की, महिलेला फक्त तिच्या भावाचीच हत्या करायची होती. पण चुकून इतर तिघांनीही विष मिसळलेली चिकन करी खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला.   


पोलिसांनी सांगितले की, चार जणांच्या मृत्यूबाबत माहिती मिळतात त्यांनी याबाबत तपास सुरू केला. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता त्यांना समजले की, या चौघांनी एका महिलेच्या हातची चिकन करी खाल्ली होती. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी केली. त्यावर महिलेनी पोलिसांना कबुली दिली. महिलेने तिच्या भावाची हत्या करण्यासाठी चिकन करीमध्ये विष घातले होते. या महिलेचे एका प्रिंटींग प्रेसच्या मालकाबरोबर अफेयर सुरू होते. मात्र तिच्या भावाचा या अफेयरला विरोध होता. त्यामुळे तिने त्याला संपवण्याचा कट रचला होता. पोलिसांनी महिलेसह प्रिंटींग प्रेस मालकालाही अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...