आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माननीय खासदारांना एकूण किती मिळताे पैसा; हे आकडे वाचून व्हाल चकित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशातील दरवर्षीचे प्रतिव्यक्ती उत्पन्न (per capita income) पाहिले तर ते जवळजवळ 1 लाख रुपये आहे. म्हणजेच साधारणपणे प्रत्येक भारतीय वर्षभरात 1 लाख रुपये कमावतो, परंतु तुम्हाला तुम्हीच निवडलेल्या नेत्याच्या पगाराबाबत माहिती आहे का? जर नाही, तर ही माहिती तुम्हाला चकित करणारी आहे. या लोकप्रतिनिधींना पगाराव्यतिरिक्त एवढे भत्ते मिळतात ज्यांची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. एका खासदाराला दरमहा 1 लाख 40 हजार रुपये फिक्स मिळतात. ज्यावर त्यापेक्षा जास्त भत्ता दिला जातो. 

फिक्स पगाराबाबत बोलायचे झाल्यास यात 
फिक्स सॅलरी/महिना : 50, 000 + 
मतदारसंघ भत्ता/महिना : 45, 000 + 
ऑफिस भत्ता/महिना : 45,000 एवढे सगळे जोडलेले असते.  

 

पण यावरही मिळतात एवढे भत्ते...
- पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या भत्त्यांबाबत बोलायचे झाल्यास याची यादी खूप मोठी आहे. 
यात डायरेक्ट एरियर (वार्षिक) : 3 लाख 80 हजार रु., 
विमानप्रवास भत्ता (वार्षिक) : 4 लाख 8 हजार रु., 
रेल्वे प्रवास भत्ता (वार्षिक) : 5 हजार रु., 
पाणी भत्ता (वार्षिक) : 4 हजार रु., 
वीज भत्ता (वार्षिक) : 4 लाख रु. यासारखे भत्ते सामील आहेत. 

 

एका खासदाराला पगाराव्यतिरिक्त जवळजवळ 1 लाख 51 हजार 833 रुपये प्रतिमाह म्हणजेच वार्षिक 18 लाख 22 हजार रुपये भत्ते दिले जातात.

 

मग किती झाला एकूण पगार...
- फिक्स्ड पगार आणि भत्ते जोडले तर एका खासदाराला एका महिन्यात 2,91,833 रुपये पगार मिळतो. म्हणजेच देशाला एक खासदार वार्षिक 35 लाख रुपयांना पडतो.

 

टॅक्स नाही लागत, वर या सुविधाही फ्री
- सर्वात खास बाब अशी की, एवढ्या पगारावर त्यांना कोणताही टॅक्स लागत नाही. यांना मिळणारे भत्ते अनेक प्रकारचे असतात. ज्यात अनेक सुविधा यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही दिल्या जातात. यात पत्नी वा जोडीदारासाइी 34 मोफत विमानप्रवास, अनलिमिटेड रेल्वेप्रवास आणि संसद अधिवेशनादरम्यान घरापासून ते दिल्लीपर्यंतचे 8 विमानप्रवासही सामील आहेत.

 

भत्त्यांमध्ये असतात या बाबी...
- भत्त्यांमध्ये जोडलेल्या गोष्टींबाबत बोलायचे झाल्यास एका खासदाराला 50 हजार युनिट मोफत वीज, 1 लाख 70 हजार फ्री कॉल्स, 40 लाख लिटर पाणी, राहण्यासाठी सरकारी बंगला (ज्यात सर्व फर्निचर आणि एअरकंडिशन, शिवाय त्यांचे मेंटेनन्सही फ्री) सामील आहे.

 

हे तर मिळणारच..
- याशिवाय जे उरते, ते आहे सिक्युरिटी गार्ड्स, आयुष्यभराची पेन्शन, जीवन वीमा आणि सरकारी गाडी, हे सरकारकडून खासदाराला मोफत दिले जाते. आता तुम्ही विचार करत असाल की, हे पुढारी किती आरामात जगत असतील नाही?

 

पुढच्या स्लाइड्सवर ग्राफिक्समधून पाहा, खासदारांना मिळणारे भत्ते...

बातम्या आणखी आहेत...