आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Naxals Were Killed In A Joint Operation By Telangana Police And Chhattisgarh Police In Pujari Kanker In Bijapur District

छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या संयुक्त कारवाईत टॉप कमांडरसह 10 नक्षली ठार, 1 जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजापूर- छत्तीसगडमधील  पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. विशेष महासंचालक डी. ए. अवस्थी (नक्षलविरोधी मोहीम) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भागांत सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. तसेच दंतेवाडा पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत तीन पोलिस जखमीही झाले होते. त्यामुळे नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जाते. दरम्यान, घटनास्थळावरून दोन एके-47 सह इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. मृतांमध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या हरी भूषण याचाही समावेश आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...