आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर- एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी रात्री बिल्डर आनंद खत्री याच्या बंद घरातून जुन्या ५०० व १ हजार रुपयांच्या सुमारे १०० कोटींच्या नोटा जप्त केल्या. या नोटा घरात तीन िठकाणी गादीसारख्या सजवून ठेवल्या होत्या. १६ जणांना ताब्यात घेण्यात अाले आहे.
हवालाच्या माध्यमातून या नोटा दुबई, अमेरिकेत पाठवल्या जाणार होत्या. अटक केलेल्या लोकांना आता जप्त केलेल्या रकमेच्या पाच पट प्राप्तिकर भरावा लागेल. शिवाय तुरुंगवासही होईल. प्राप्तिकर रक्कम भरली गेली नाही तर त्यांच्या अचल संपत्तीमधून ती वसूल केली जाईल.
तीन खोल्यांमध्ये नोटा
कानपूरमध्ये बिल्डर खत्री याच्या स्वरूपनगर भागातील घरात तीन खोल्यांमध्ये या नोटा ठेवलेल्या होत्या. खत्री मूळ गुजरातमधील सुरतचा रहिवासी आहे.
रिअल इस्टेटसह त्याचा कपड्यांचा व्यापार असून त्याच्या २१ कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय लखनऊ, नोएडा, कानपूर आणि सुरतमध्ये पसरलेला आहे.
मेरठ येथेही सापडल्या होत्या २५ कोटींच्या जुन्या नोटा
काही दिवसापूर्वी मेरठ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक संजीव मित्तल यांच्या घरात थाटण्यात आलेल्या कार्यालयातून सुमारे २५ कोटीं रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी चौघांना अटकेत आहेत. ही रक्कम एका प्रसिद्ध तेल कंपनीच्या माध्यमातून बँकेत पाठवण्यात येणार होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.