आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीत पूल काेसळून 18 ठार, 50 जखमी, तीन मजुरांचा वाचवला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल  काेसळून १८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील कँट स्थानकाजवळ मंगळवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला.

 

पुलाखाली वाहतूक सुरू असतानाच एक पिलर व सिमेंट काँक्रीटचा २०० मीटर लांब ब्लाॅक काेसळल्याने त्याखाली चार कार, पाच अाॅटाे, एक मिनी बस, अनेक दुचाकी अादी वाहने दबली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात अाले, मात्र त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. तीन मजुरांना पिलरखालून जिवंत काढण्यात बचाव पथकाला यश अाले.

 

प्रोजेक्ट मॅनेजर निलंबित
या प्रकरणी उड्डाणपुलाचे मुख्य प्रोजेक्ट मॅनेजर एच. सी. तिवारी, प्रोजेक्ट मॅनेजर के. आर. सुदन, अभियंता राजेशसिंह आणि वरिष्ठ अभियंता लालचंद यांना निलंबित केल्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले. दरम्यान,  मुख्यमंत्री याेगी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील लहरतारा भागात या पुलाचे काम २०१६ पासून सुरू अाहे.  दाेन दिवसांपूर्वी पुलाच्या गर्डरवर स्लॅब टाकण्यात अाला हाेता. हे काम सुरू असताना पुलाखालील वाहतूक बंद नव्हती. हा निष्काळजीपणा निष्पाप प्रवाशांच्या जिवावर बेतला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...