आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांचा मुलागा पोलिस ठाण्यात गेला अन् म्हणाला- पप्पांना चांगला धडा शिकवा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटावा- यथे एका 12 वर्षाच्या मुलाने वडिल जत्रेत घेऊन न गेल्याच्या रागातून थेट पोलिस स्टेशन गाठले आणि वडिलांविरोधात तक्रार केली. एवढेच नाही तर, त्यांना चांगला धडा शिकवा अशी विनंती देखिल केली. त्याचे बोलणे ऐकूण पोलिसांना देखिल धक्का बसला. यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना बोलवून घेतले आणि पोलिसांनी आणखी काही मुलांना एकत्र बोलवून सर्वांना जत्रेत इटावा यात्रेत पाठवले.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- सध्या इटावा महोत्सव सुरू आहे, त्यामळे येथे जत्रा भरली आहे. काही दिवसांपूर्वी ओम नारायण गुप्ता (12) नावाचा मुलाने वडिलांना यात्रेत नेण्यासाठी अग्रह केला. परंतु, वडिलांना त्याच्यावर रागवून त्याला पळवून लावले.
-  यानंतर तो सरळ पोलिस ठाण्यात पोहोचला आणि तिथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे वडिलांना धडा शिकवा असे सांगू लागला.


मुलाने पोलिसांकडे केली अशी तक्रार...
- इटावा एसएसपी वैभव कृष्ण यांनी सांगितले की, 31 डिसेंबरला संध्याकाळी एक मुलगा पोलिस स्टेशनमध्ये आला. तो म्हणाला- त्याचे वडिल दुकान चालवतात, खुप व्यस्त असतात आणि कुठेच फिरायला घेऊन जात नाही.
- तुम्ही माझ्या वडिलांना रागवा आणि मला यात्रेत घेऊन जाण्यास सांगा आणि कुटुंबाला वेळ देण्यास सांगा. माझे सर्व मित्र जात आहेत, परंतु मी अग्रह करून देखिल ते मला घेऊन जात नाही.
- यानंतर पोलिसांनी एक प्लॅन केला आणि 40-50 मुलांना एकत्र करून त्यांना यात्रेसाठी पाठवून दिले.


पालकांनी कुटुंबाला वेळ द्यावा...
- एसएसपी म्हणाले, आई-वडिल किंवा जे कोणी पालक असतील, त्यांनी आपल्या पाल्याला आणि कुटुंबाला वेळ द्यावा, यामुळे ते संतुष्ट राहतील
- तक्रार घेऊन जो मुलगा पोलिस ठाण्यात आला होता, यामुळे समाजातील दृष्टीकोण समोर आला आहे. ज्या पद्धतिने मुलाने नैसर्गीक रूपात आपली तक्रार सांगितली, असे क्वचितच होते. यावर सर्वांना लक्ष देणे गरजेचे आहे.


आयपीएस नवनीत सिकेरा यांनी केले ट्विट...
आपल्या मुलाला कधीच म्हणू नका, की जे करायचे ते करून घे. पोलिस गोंधळले की आता काय करावे? इटावा पोलिस आता मुलांना यात्रेसाठी गेऊन गेले आहेत, लवकरच फोटो शेअर करेल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...