आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग रंगीत दिसावे म्हणून 20 रंगांनी रंगवली गावातील घरे; घरांच्या भिंतींवर लिहिली घाेषवाक्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर- हाेळी-रंगपंचमीच्या दिवशी देशात सर्वत्र रंगवलेले चेहरे दिसतात. मात्र, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरहेटा गावातील घरांच्या भिंतीदेखील हाेळीच्या रंगांत रंगल्या अाहेत. सकाळी उठताच हे जग रंगबेरंगी दिसावे व चांगले व सकारात्मक भाव-विचारांनी दिवसाची सुरुवात व्हावी म्हणून गावातील ग्रामस्थांनी २० रंगांचा वापर करत प्रत्येक घराच्या भिंती रंगवून टाकल्या.


या गावातील प्रत्येक घराच्या भिंती वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या अाहेत. एवढेच नव्हे, तर एक-एक भिंत विविध रंगांनीही रंगवण्यात अाली अाहे. हे सर्व सरकारच्या काेणत्याही याेजनेंतर्गत नाही, तर गावास रंगबेरंगी बनवण्यासाठी व गाव सकाळी चमकदार दिसावे म्हणून करण्यात अाले अाहे. गावातील लाेकांना वसंताेत्सवाच्या त्या सुगंधाचा अनुभव राेज यावा यासाठीही हे केले अाहे. कारण त्यांना यासाठी हाेळीची प्रतीक्षा करावी लागते.


कालपर्यंत या गावात कचऱ्याचे ढीग  दिसत हाेते; परंतु अाज या गावाची स्थिती बदलली अाहे. एका स्वयंसेवी संस्थेने हे गाव दत्तक घेतले व गावाचा चेहरामाेहरा बदलला. गावातील घरे लाल, गुलाबी, जांभळा, निळा, पिवळा अादी रंगांनी रंगवली असल्याने गाव रंगबेरंगी दिसते.    

 

असे बदलले गाव...
सुमारे अडीच ते तीन हजार लाेकसंख्येच्या या गावात ८०० कुटुंबे राहतात. तीन वर्षांपूर्वी गावाची वाईट अवस्था पाहून निमराना ग्रुप अाॅफ हाॅटेल्सने गाव दत्तक घेतले व गावाचे चित्र बदलण्याचा निश्चय केला. गाव स्वच्छ केले व दुरवस्था झालेल्या अंगणवाडीत सुधारणा करून मुलांसाठी मैदान बनवले. अाता गावाचा नूरच पालटल्याने अाबालवृद्ध सारेच अानंदी अाहेत.

बातम्या आणखी आहेत...